राहाता तालुक्यातील
सावळीविहीर बुद्रुक येथील धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व असणारे कै. विठ्ठल मनाची गडकरी यांचे प्रथम पुण्यस्मरण सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी असून त्यांना त्यानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली .
कै. विठ्ठल मनाजी गडकरी यांच्या नावातच विठ्ठल होते.
त्यांचे हयातीत लहानपणापासून अनेक वर्ष संगमनेर येथील गंगामाईच्या घाटावर सद्गुरु महंत सितारामजी महाराजांच्या मठामध्ये आयुष्य गेले. त्यामुळे मोठा धार्मिक पगडा त्यांच्या मनावर होता व त्यामुळेच शेवटपर्यंत दररोज पूजापाठ ,धार्मिक वृत्ती त्यांनी जोपासली होती.
दक्षिण भारतातीलह अनेक तीर्थक्षेत्रांची त्यांनी यात्रा केली होती. धार्मिकते बरोबरच प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानी, परखड वकृत्व असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. लहानपणी कोतुळ तालुका अकोले येथे त्यांचे पूर्वीची चौथी पास शिक्षण झाले होते. शाळेत असताना त्यांना कुस्तीची आवड होती.
शेती काम कुस्ती यामुळे त्यांचे शरीरही सुदृढ होते. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांचे मानसिक आरोग्य व्यवस्थित होते. पांगरी येथे श्री हनुमान मंदिरात लहानपणी त्यांना साताऱ्याचे नानापत्री सरकार हे स्वातंत्र पूर्व काळात भेटले होते. त्यांनी दिलेला उपदेश व पुस्तके हे शेवटपर्यंत त्यांच्या मनात ठाम वसलेले होते.व त्याप्रमाणेच त्यांचे निर्भीड व स्पष्ट, परखड असे वागणे होते.
मोठे दोन्ही बंधू गेल्यानंतर गडकरी या मोठ्या परिवारात ते ज्येष्ठ व्यक्तिमत्व होते. ज्येष्ठ असल्याने त्याने सर्व नातेवाईक कुटुंबातील सदस्य नातू मुले सुना पुतणे पुतण्या जावई सर्वांशी त्यांचे असे ऋणानुबंध घट्ट बनले होते. एवढेच नव्हे तर गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवार ,यांच्याशी त्यांचे आपुलकीचे संबंध सर्वांनाच आजही वर्षानंतर आठवण येताच भावूक करून जातात. पांगरी (कोतुळ ),संगमनेर व त्यानंतर सावळीविहीर असा त्यांचा जीवन प्रवास होता.
संगमनेर इथून ते सावळीविहीर येथे लक्ष्मीवाडी साखर कारखान्यात नोकरीला लागल्यानंतरही त्यांनी आपला धार्मिक व प्रामाणिक आणि स्वाभिमान कधी सोडला नाही. कोणत्याही अभिलाषेसाठी असत्य ते वागले नाहीत. सत्यता व स्वाभिमान त्यांच्या रक्तारक्तात भरलेला होता. स्वच्छ, सुंदर व मनमोकळं त्यांचं वागणं त्यामुळे ते नातेवाई, गावात , सर्व परिचित होते. आपल्या चारही मुलांना त्यांनी सुशिक्षित व सुसंस्कृत बनवले.
लक्ष्मीवाडी कारखान्यातही ते कामगारांच्या बाजूने सत्यासाठी शेवटपर्यंत लढले. कोणत्याही गोष्टीत स्वार्थ कधी पाहिला नाही. भोळा , मनमिळावू, पण परखड, स्पष्ट स्वभाव, कोणाची हाजी हाजी नाही किंवा कोणाला अरे रावी नाही, असे व्यक्तिमत्व असणारे तसेच पांढरा पायजमा, पांढरा शर्ट व टोपी असे महाराष्ट्राचे शान असणारे साधे राहणीमान, मात्र चांगले ,उच्च, सत्य , निर्भीड व अध्यात्मिक विचार, स्वच्छ आचरण, आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्यामुळे ते सर्व परिचित असे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व होते.
पंधरा वर्षांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता . एन्ंजोप्लास्टीही झाली होती. तरीही ते शेवटपर्यंत डगमगले नाही. मात्र 91व्या वर्षी चालता बोलता अल्पशा आजाराने एक वर्षापूर्वी गुरुवार दिनांक 16/ 11/ 2023 रोजी सकाळी सकाळी मंदिरात काकडा सुरू असतानाच अचानक झोपेतून ते उठले,
व नामस्मरण ऐकता ऐकता भरकन एखादं पाखरू आकाशात उडल्याप्रमाणे ते आपल्यातून निघून गेले. स्वर्गवासी झाले. त्याला वर्ष झालं, मात्र आजही त्यांच्या स्मृती, त्यांची आठवण , आजही स्मरणात आहे.
प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांना दैनिक साईदर्शन परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!