कांदेंनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचा भेट घेतली.कांदेंनी आणलेला खोका महागडा दिसत होता. तो उघडण्यात आला, तेव्हा त्यात ड्रायफुट्स होते. ते पाहून जरांगे यांच्यासह सगळेच उपस्थित हसले. यानंतर जरांगे आणि कांदे शेजारी बसले.त्यामुळे ओबीसी मतांची फाटाफूट होणार आहे.
अशा परिस्थितीत मराठा मतं निर्णायक ठरतील. त्यांचीच जुळवाजुळव करण्यासाठी कांदेंनी जरांगेंची भेट घेतली का, अशी चर्चा रंगली आहे. भुजबळांचे दोन कट्टकर विरोधक भेटत असल्यानं कांदे आणि जरांगेंची भेट चर्चेत राहिली. कांदे यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जरांगे यांना नमस्कार केला.
त्यानंतर कांदेंनी त्यांच्या खांद्यावर भगवी शाल देत सत्कार केला. मग पुष्पगुच्छ देण्यात आला. सर्वात शेवटी कांदे जरांगेंना एक खोका द्यायला गेले. हा खोका सर्वात लक्षवेधी ठरला. खोका पाहताच जरांगेंनी हात जोडले. त्यांनी तो नाकारला.