शिर्डी ( प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणारी शिर्डी ही साईबाबांच्या पदस्पर्शने पुनीत झालेली भूमी आहे .ह्या भूमीत श्री.साईबाबांचे दर्शनासाठी देश विदेशातून साईभक्त दर्शनासाठी येत असतात. येथे पूर्वी पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश असतांना येथील गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केल्याने शिर्डीतील गुन्हेगारी संपली होती. त्यांनी येथील गुन्हेगारांना आपल्या खाकी वर्दीचा वापर करून चांगल्या चांगल्या् सराईत गुन्हेगारांना जेल ची हवा दाखवली.
परंतु त्यांची बदली झाली. त्या नंतर काही काळ गेला आणि अ.नगर जिल्ह्याला अति कर्तव्यदक्ष म्हणून ज्यांची ख्याती होती ते पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची नियुक्ती झाली. यांची नियुक्ती झाल्यावर जिल्हा वासियाना वाटले कि, राकेश ओला यांना संपूर्ण जिल्ह्याची माहिती आहे, कारण कि ओला यांनी ह्यापूर्वी नगर जिल्ह्यात श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीला आळा बसेल .कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याचा प्रयत्न होईल. मात्र सध्या तरी तसे होताना दिसत नाही.
असे जिल्ह्यातील नागरिकांकडून आता बोलले जात आहे.
अहिल्यानगरच्या इतिहासात प्रथमच भ्रष्टाचार, खंडणी आदीसह हफ्त्याच्या मुद्दा धरून अ. नगरच्या खासदाराला उपोषण करावे लागले होते.आणि अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारी चोऱ्यांचे प्रमाण वाढले. त्यासाठी आंदोलन करावे लागले. असे असताना येथे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी कमी होत नाही.
विशेष म्हणजे शिर्डी सारख्या पवित्र भूमीत देश-विदेशातून साईभक्त येत असतात .हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे .मात्र येथे राजरोसपणे मारामाऱ्या ,गुंडगिरी, सुरू आहे. पाकीट मारी , चैन स्नेचिंग. साई भक्तांच्या गाड्यांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तूंची चोरी, मोटरसायकल चोरी, परिसरातील आठवडे बाजारांमधून मोबाईल चोऱ्या, आदी प्रकार वाढले आहेत. चक्क दिवाळीच्या दिवशी गुन्हेगारांनी शिर्डीत आपापसात वार करून पोलिसांना जणू सलामी दिली आहे.
त्याची फिर्याद देखील शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल आहे. शिर्डी मध्ये व जिल्ह्यामध्ये अनेकदा आपापसात हाणामाऱ्या, अवैध मटका धंदे ,दारू धंदे, गांजा विक्री, सर्रास सुरू आहे, त्यामुळे गुन्हेगारी वाटत आहे, याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे लक्ष आहे की नाही? असा सवाल आता जिल्ह्यातील नागरिकांकडून होत असून गुन्हेगारीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.