Letest News
पोलिसांनीच त्यांची हत्या केली आहे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं राहुल गांधी ना.राधाकृष्ण विखे जलसंपदा मंत्री झाल्यानंतर त्यांचा लोणी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सत्कार! shirdi news साईंच्या झोळीत साईभक्तांनी टाकले भरभरून दान गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता भट्टाचार्य साईंची मूर्ती खरंच झीझली आहे का? तज्ञांनी दिलेल्या सुचनेने चर्चेला उधान!!साई संस्थान मूर्तीची काळजी ... बनावट दर्शन पास या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशनला फिर्याद का नाही? shirdi saibababa news श्री साईबाबा संस्थानची नाताळ व नूतन वर्षाची तय्यारी पूर्ण प्रशासन सज्ज मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड...
अ.नगरराजकीय

शिंदे गटाचा बार ठरला फुसका !

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून,आता मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत.त्याच धर्तीवर राज्यात बरीच राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत.
कोपरगाव तालुका त्याला अपवाद असल्याचे दिसत नाही,आपले नामनिर्देशन पत्र भरण्याच्या आधी आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत आम्ही

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आ.आशुतोष काळेंच्या विरुध्द फॉर्म भरणार अशी भिमगर्जना करणाऱ्या शिंदे सेनेने आपले हत्यार म्यान केले असून,’हॉटेल बासुरी ‘ येथील नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत आपली नांगी टाकली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे शिंदे सेनेच्या जिल्हाध्यक्षांची हवा गेली असल्याचे मानले जात असून आ.काळे यांनी त्यांना गुंडाळले असल्याचे चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- २०२४ ची रणधुमाळी मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे.राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार आहे.त्याला कोपरगाव विधानसभा मतदार संघ अपवाद नाही.

येथील राजकीय समीकरणे झपाटयाने बदलताना दिसत असून येथील पारंपरिक राजकीय नेतृत्व करणारे कोल्हे कुटुंबाने आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेपुढे सपशेल लोटांगण घातले असल्याने विद्यमान अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे यांना आपला सत्तेचा सोपान (रस्ता) प्रशस्त झाला असल्याचे मानले जात असले तरी तालुक्यात शरद पवार गटाची अर्थातच संदीप वपें यांची विशेषत्वाने ग्रामीण भागात सुप्त लाट झपाटयाने बदलताना दिसत आहे.

मात्र या दरम्यान काळे गटास मात्र एक समाधानाची बाब समोर आली असून यात गेली पंचवीस वर्ष पोहेगाव ग्रामपंचायतीत निर्विवाद आपली सत्ता टिकविनाऱ्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे यांच्या गटाची लोकसभा निवडणुकीत आ.काळे गटाने उपेक्षा केल्याचे पार्श्वभूमीवर एक शुक्रवारी रात्री ०८ वाजेच्या सुमारास होन यांचे मालकीचे,’हॉटेल बासुरी’ येथे नुकतीच एक गुप्त बैठक संपन्न झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली असून यात आ.आशुतोष काळे यांचेसह शिंदे सेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी,उत्तर जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे,जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते,नितीन औताडे,

उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब रहाणे,तालुकाध्यक्ष रावसाहेब थोरात,शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष भगीरथ होन,बाजार समितीचे संचालक अशोक नवले,आदींसह जवळपास वीस-बावीस कार्यकर्ते उपस्थित होते आहे खात्रीलायक माहिती हाती आली आहे.सदर बैठकीला जवळपास तीन-चार पदाधिकाऱ्यानी दुजोरा दिला आहे.मात्र सदर बैठकीत मोबाईल नेण्यावर बंदी असल्याने छायाचित्र उपलब्ध होऊ शकले नाही.

दरम्यान या निवडणुकीत जाहीर करूनही शिंदे गटाचे नितीन औताडे यांनी घोषणा करूनही आपले नामनिर्देशन भरले नाही.अर्थातच यात त्यांना आता कोल्हे सोडून काळे कडून अपेक्षा वाढल्या आहेत.कोल्हे गटाचे आता विधानसभेचा गड सर करण्याचे स्वप्न भंगल्याने त्यांचा (कोल्हे औताडे यांचा) अलिखित करार मोडीत निघाला असल्याचे मानले जात आहे.त्यात त्यांना एक जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती जागा असे वाटप ठरले असल्याची माहिती होती.मात्र आता राजकीय चित्र झपाट्याने बदलले असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे शिंदे सेनेने तालुक्यातील राजकीय वारे ओळखले असल्याचे मानले जात आहे.त्यात त्यांनी आपल्या पहिल्या कराराला मूठ माती देऊन आता नवीन सोयरिक जुळवली असल्याचे मानले जात आहे.कारण पोहेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचे बोटावर निभावले असल्याचे चांगले भान या गटास असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे आ.काळे गटास जवळीक साधल्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण काबीज करणे सोपे जाईल असे साधे सोपे त्यामागील गणित असल्याचे मानले जात आहे.

त्यामुळे विळ्या-भोपळ्याचे नाते असले तरी त्यांनी ही बैठक घेऊन नवी राजकीय दिशा दाखवून दिली आहे.कारण उंदीर दिसण्यापूर्वी मांजर शांत असते तशी काही माणसे असतात.मोहाचा क्षण येताच ते आपले खरे रूप दाखवत असतात; याचा दाहक अनुभव कोल्हे गट शिंदे गटाबाबत आता घेत असेल यात शंका नाही.’काम संपल्यावर प्रत्येक ओळख अनोळखी होऊन जात असते हे विसरता येणार नाही’ हे राजकीय सत्य इथे ओळखणे महत्वाचे.

दरम्यान या करारात त्यांना दोन जिल्हा परिषद गट आणि चार गण अशी सत्तेचे वाटप ठरले असल्याचे समजत आहे.मात्र याबाबत आ.काळे गटाने आपले पत्ते स्पष्ट केलेले नाही मात्र यात सत्ताधारी असलेल्या कोल्हे गटास विश्वासात घ्यावे लागेल असे कारण देऊन आपली वेळ मारून नेली असल्याची माहिती आहे.(काळे आणि कोल्हे एकच आहे याची अनुभूती आगामी काळात शिंदे सेनेच्या जिल्हा सेनापतीला येणार आहेच)

कारण उंदीर दिसण्यापूर्वी मांजर शांत असते तशी काही माणसे असतात.मोहाचा क्षण येताच ते आपले खरे रूप दाखवत असतात.त्यामुळे खरच निवडणुकीनंतर आ.काळे गट हा शब्द पाळणार का असा सवाल निर्माण झाला आहे.मात्र पोहेगावच्या नैऋतेकडील गावात निळवंडे कालवा समितीचा मोठा प्रभाव असल्याचे मागील विधानसभा निवडणुकीत दिसून आले होते.

त्याचा फायदा काळे गटास मिळाला होता तर कोल्हे गटास शिर्डी कोपरगाव शहराच्या बंदिस्त निळवंडे जलवाहिनीचा पंगा चांगलाच महाग पडला होता.पण त्याची दखल आ.काळे यांनी घेतली नाही समितीला अदखल केल्याचे वारंवार दिसून आले आहे.परिणामी आ.काळे यांचे विरुध्द वातावरण झपाट्याने बदलत असल्याचे दिसून आले आहे.आता दरम्यान आ.काळे यांची अवस्था ही,’पिराचे पिराला पडले तर तर फकिरांची फिकीर कोण करणार’ अशी स्थिती निर्माण होण्याच्या शक्यता अधिक आहे.

कारण आ.आशुतोष काळे गटाने आपल्या सत्तेचे सोपान चढून ही समितीचे कार्य महसूल मंत्री विखे आणि माजी मंत्री थोरात यांच्या पावलावर पाऊल ठेवून कधीच औदार्य दाखवून मोठ्या मनाने मान्य केलेलं नाही हे विशेष ! सत्य कबुतरांच्या पावलांनी येत असते त्याची चुणूक त्यांना आगामी काळात पाहायला मिळू लागू शकते त्यामुळे त्यांची अडचण वाढण्याची शक्यता अधिक आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button