राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमात कार्तिक मास पर्वताला बहुदेशीसह प्रदोष चातुर्मा समाप्ती व तुलसी विवाहारंभ
शिर्डी ( प्रतिनिधी)
राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या परंपरेनुसार मठाधिपती प. पू. स्वामी रमेशगिरीजी महाराज
यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान येथे
कार्तिकमास पर्वकाल, द्वादशीसह प्रदोष, चार्तुमास समाप्ती व तुलसी विवाहारंभ, वैकुंठचर्तुदशी पूर्वरात्र, गोपद्मव्रत समाप्ती व प.पु. बाबाजींच्या पालखीची मिरवणुक
मिती कार्तिक शु ।। १२ शके १९४६ बुधवार दिनांक १३/११/२०२४ रोजी आयोजित केले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी प्रवचनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहान करण्यात आले आहे. यावेळी प्रदोष संत्सग – प. पू. स्वामी रमेशगिरीजी महाराज शिवभक्त भाऊ पाटील, त्र्यंबकेश्वर -यांचा होणार आहे. यावेळी प. पू. स्वामी रमेशगिरीजी महाराज मठाधिपती, समाधीस्थान, बेट कोपरगांव
प. पु. संत दत्तगिरीजी महाराज मठाधिपती, वैजापुर आश्रम
श्री. सतिष सुभाषशेठ लोढा श्री. आनंद सुभाषशेठ लोढा श्री. जीवन सुभाषशेठ लोढा सर्व विश्वस्त श्री संत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान, बेट कोपरगांव आदी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.