कोपरगावच्या नेत्यांना आमदारकी केवळ आपल्या साखर कारखानदारीला संरक्षण पुरविण्यासाठी हवी आहे हे मतदारांनी वेळीच ओळखले तर बरे होईल अन्यथा आगामी काळात तुम्हाला हत्ती पायी तुडवले जाईल असा इशारा आपक्ष उमेदवार संजय काळे यांनी मतदारांना नुकताच एका प्रचारसभेत दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- २०२४ ची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे.राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार आहे.त्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघात दोन्ही पवार गटाच्या बाजूंनी जोर लावला जात असून ग्रामीण व शहरी भागात सभा आणि फेऱ्याना ऊत आला आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्याला अपवाद नाही.येथील अपक्ष उमेदवार संजय काळे यांनी आज आपली प्रचार सभा डॉ.आंबेडकर मैदानावर आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी उच्च न्यायालयाचे ऍड.अजिंक्य काळे,कन्या आदीसह बहुसंख्य मतदार उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”उक्कडगावातील स्मशान भूमी पाण्यात बांधले आहे.गोधेगावत आजही स्मशानभूमी नाही.शिरसगाव येथे बाजारतळावर बारा लाखांचा मुरूम पडला त्याची रॉयल्टी भरलेली नाही.त्यामुळे हा आमदार चुकलेला आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळे कोल्हे परजणे आदींची एकत्रित सत्ता आहे.मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांना आजही मिळत नाही.करंजी गावात आदिवासी झोपडीत राहतात.जागेवरून वाद दाखवून उपलब्ध करून दिली जात नाही.ओगदित शहीदाचे स्मारक दुरावस्थेत आपण त्याची स्वच्छता केली आहे.अंचलगावला जायला रस्ता नाही.खीर्डी गणेशचा रस्ता आत्ता झाला त्याचे डांबर निघून गेले आहे.नाटेगावात चांगला रस्ता नाही.
शिंगणापूरला २९ कोटी रेल्वे स्थानकाला आणले म्हणतात पण त्याचा निधी केंद्र देते केंद्राचे पंतप्रधान मोदी यांनी त्याचे ऑनलाइन उद्घाटन केले आहे.मग आमदाराचा संबंध काय ? रेल्वे स्टेशन रस्ता खराब झाला आहे.तालुक्यात आल्यावर रस्त्यावरून कोणीही शिव्या घातल्याशिवाय राहत नाही.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी.सावळीविहिर ते कोपरगाव,त्या रस्त्याचे काम होत नाही.उच्च न्यायालयात आपण त्याबाबत आपण दाद मागितली त्यावर न्यायालयाने सदर रत्याची हमी देत नाही तो पर्यंत याचिका निकाली निघणार नाही असे बजावले आहे.त्यात त्यांचे काहीच योगदान नाही.अडीचशे कोटी आणल्याचा हास्यास्पद दावा आमदार काळे हे करत आहे.
कामासाठीशिंगवे पुणतांबा रस्त्याची अवस्था वाईट आहे.नागरिक दहशतीत आहे त्यावर उघड बोलायला कोणी तयार नाही.ब्रिटिशांना जे नागरिक दबले नाही ते वर्तमानात या सत्ताधाऱ्यांनी दाबले आहेत.सरंजाम शाही छत्रपती शिवाजी महाराज यांना मान्य नव्हती.आज आपल्या कृतीने ती आज चोरवाटेने पुन्हा परत येत आहे असा दावा केला आहे.लोकप्रतिनिधी आज हे वाईट प्रथा पडताना दिसत आहे.घटनाकार डॉ. आंबेडकर यांनी लोकशाहीत व्यक्तीनिष्ठेतेला तुच्छ लेखले होते.तालुक्यात आज नेमके तेच घडत आहे.पप्रगत म्हणून ढोल बडवनाऱ्यांच्या मतदार संघात आज चोळकेवाडी,चीतळी आदी गावांना आजही बस जात नाही.दुष्काळी असलेले जवळके,रांजणगावला जाणारा रस्ता एक महिन्यात खराब झाला आहे.याला काय म्हणणार आहे.परिणामी सर्व ग्रामस्थ संगमनेर तालुक्यात खरेदीसाठी जात असून शहराचे अर्थकारण कोलमडले आहे.निळवंडेत आमदार आशुतोष काळे यांचा कोणताही सहभाग नाही.निळवंडे कालवा कृती समितीने रस्त्यावरील संघर्ष करत उच्च न्यायालयात याचिका केली कलव्याना त्यांनी पाणी आणले पण त्याचे श्रेय आमदार काळे हे घेत आहे.उजनीची तीच बाब आहे.त्यावेळी उजनी कृती समितीने संघर्ष केला स्व.खा.सूर्यभान वहाडणे यांनी त्याला युती शासनाकडून निधी आणला पण त्याचे श्रेय ही मंडळी घेत आहे हे दुर्दैव आहे काकडी विमानतळ कोपरगाव तालुक्यात आहे.त्यासाठी काकडी येथील संघर्ष समितीने संघर्ष केला जमिनी दिल्या आहेत विमानतळ मंजूर केले आहे पण आज त्याच्यावर वर्चस्व लोणीचे आहे.बाकी निधी केंद्राने दिला त्याचा १५०० कोटींचा निधीचे श्रेय आ.काळे हे घेत आहेत.
मतदार संघातून शेती सिंचन करणारा गोदावरी डावा आणि उजवा कालवा जातो सिंचनाचे पाणी पुरवले जाते.पण त्याला २२००,कोटी निधी आणल्याचा दावा केला जातो.यांना माहीती आहे का या कालव्यांचे पाणी निर्माण कसे झाले आहे.त्यासाठी अनेक भूमिपुत्रांचे बळी गेले आहे.उजव्यावर ४१ हजार हेक्टर क्षेत्र आहे.गोदावरीचे कालवे केंव्हा वाहतात तर जेंव्हा दारू कारखाण्यास पाणी लागते असा आरोप संजय काळे यांनी करून मतदारांना जागे व्हा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले आहे.गोदावरी कालव्यांची गळती ७२ टक्क्यांवर गेली आहे.त्याकडे कोणी लक्ष देत नाही.हे पाणी गळती नाही त्याची चोरी होत असल्याचा आरोप केला आहे.हे पाणी दारू बणविण्यास जाते आहे.एक लिटर दारुसाठी ४५ लिटर पाणी लागते.त्यासाठी ही मोठी गळती दाखवली जात आहे.त्यासाठी यांना आमदारकी लागतं आहे.माहेगाव देशमुख येथील प्राथमिक रुग्णालय (ग्रामीण रुग्णालय) हे बेफिकिरीचे बळी जात आहे.ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर नाही.त्यामुळे मी निवडणुकीत उभा राहिलो आहे.कोपरगाव येथे आपण प्रयत्न करून तालुका पोलीस ठाणे निर्माण केले आहे.त्यासाठी आपण उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने हे यश मिळाले आहे.राज्यात २५ टक्के आकृती बंधा प्रमाणे पोलीस कर्मचारी नव्हते आपण त्याकडे उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले असता राज्याला न्यायालयाने आदेश दिला व राज्यात २४ हजार कर्मचारी भरले गेले आहे.राज्य शेती महामंडळाच्या जमिनीवर काही आदिवासी राहत आहे.त्यांना घरासाठी अद्याप जागा नाही त्यासाठी आपण आवाज उठवला आहे.आ.काळे यांचे लक्ष वेधून घेतले पण त्यांनी लक्ष दिले नाही.तथापी सावळीविहीर येथील जमीन औद्योगिक वसाहतीला ५५० हेक्टर जागा दिली जाते.पण आदिवासींना जागा मिळत नाही.
वडगाव बक्तरपुर हे गाव दहिगाव बोलका येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जोडली आहे.नागरिक कसे त्याचा फायदा घेणार असा सवाल केला आहे.आ.काळे यांना घरात सर्व पदे लागतात.सहकारी कारखाना चेअरमन,जिल्हा बँक संचालक,साई संस्थान,रयत शिक्षण संस्था आदीं पदांवर हल्ला चढवला आहे.आ.काळे यांना आपण आमसभेत सवाल केला तर त्यांनी आमसभा घेणे बंद केल्याचा आरोप केला आहे.
मला निवडून द्या मी प्रत्येक गावात आमसभा घेईल,आमदार काय असतो हे दाखवून देणार आहे.वर्तमान नेते केवळ दहावे,तेरावे करतात.बाकी काही काम करतात.त्यांना दिमतीला डझनभर कार्यकर्ते हवे असतात तरच हे गावोगावी जातात.आपण मतदारांना हमी देतो मी २४ तास उपलब्ध राहील.
दरम्यान निवडणूक खर्चावर हल्लाबोल करताना संजय काळे यांनी निवडणूक खर्चाच्या ४० लाखापैकी यांनी ०९ तारखे पर्यंत ०६ लाख खर्च केले आहे.कृष्णाई मंगल कार्यालयात आयोग त्यांच्या केवळ दोन रूम भाड्याने घेतल्याचे दाखवतो आहे.लाखो रुपये भाडे देणे आवश्यक आहे.निव्वळ शहरात १०० फ्लेक्स आहे.माझी निवडणूक निवडणूक आयोगा विरुद्ध तक्रार असून काही उमेदवारांनी उत्तर प्रदेशातून एल.ई.डी.स्क्रीन असलेल्या गाड्या आणल्या असताना त्याबाबत खोटे बोलले जात आहे.
दरम्यान आपण दुसरा लढा हा बारामतीच्या मांडीवर जावून बसलेल्या उमेदवाराच्या विरुद्ध (संदीप वर्पे)असल्याचा आरोप केला आहे.एका नगरसेविकेने त्याच्या विरुध्द विनयभंगाची तक्रार केली होती.कुठलीही महिला आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून घेणार नाही असा दावा करून त्यांनी दुसरा उमेदवार हे डमी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सहकारी साखर कारखानदारीचे वाभाडे काढताना त्यांनी ऊस उत्पादकांची लूट कारखानदार करत असल्यावर बोट ठेवले आहे.शेतकऱ्यांचा ऊस पेटवून दिल्याने त्याचे २० टक्के वजन घटते असा विद्यापीठाचा अहवाल आहे.तरीही ती कृती केली जात आहे.शेतकऱ्यांना तुम्ही किती लुटणार असा सवाल केला आहे.ही मंडळी ऊस वजनात शेतकऱ्यांना मारत आहेत.जो शेतकरी तक्रार करील त्याची रस्ता कोंडी केली जात असल्याचा आरोप केला आहे.
साई संस्थानने विखे यांच्या आदेशाने शेतकऱ्यांची फुले हारवाले लुटतात या सबबीखाली यांनी बंद केली होती.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले मात्र त्याकडे लोणीकर यांनी दुर्लक्ष केले जाते.हीच मंडळी शिर्डी विमानतळावर तिकीट ४ हजाराचे असताना ते २० हजारात घेता त्याची कुठेही तक्रार करत नाही त्यांना ते चालते.पण शेतकऱ्याच्या फुलांना शेतमालाला भाव मिळाला तर यांच्या पोटात दुखते.साईबाबाना आपण न्यायिक लढ्यातून फुले चालू करून उच्च न्यायालयातून शेतकऱ्यांना न्याय दिला आहे.
कोपरगाव पाच क्रमांकाच्या साठवण तलावाची माती उचलून नेण्यासाठी आपण व तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रयत्न केले असता ते तत्कालीन आमदार कोल्हे यांनी हाणून पाडले मात्र तालुक्याचा आमदार बदलला आणि लगेच माती उचलली गेली.दगड हवा म्हणणारा ठेकेदार दगड नेण्यास लगेच नकार देतो याचे गौडबंगाल काय आहे.तळ्याची साईज दोन लाख चौ.फूट काम खोदाई कमी केली असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने प्रवाही पाणी तळ्यात येत नाही.तलावाचे पाणी अद्याप वापरले जात नसताना तीन दिवसाआड पाणी कसे मिळत आहे ते त्यावेळी देऊ शकत होते पण ते जाणीवपूर्वक दिले नाहीं.
कोपरगाव शहरातील महिलांना वर्तमानात प्रसाधनगृह नाही याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे.त्यासाठी दूरदृष्टी लागते पण त्याचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.आपण बसस्थानकावरील प्रसाधन गृह सुरू केले आहे.त्यातून काही लोक पैसे कमवत आहे.
नवीन सरकारी नियमाप्रमाणे आपल्या आईचे नाव आपण आपल्या पाठीशी लावले आहे मात्र अन्य कोणीही उमेदवाराने ते लावले नाही याकडे लक्ष वेधून घेतले आहे.
दोन्ही बारामती कर एकच आहे.सुनेच्या विरुद्ध उमेदवार दिला नाही हे समजून घ्या व हे लक्षात घेऊन कचरा पेटीला मतदान करा असे आवाहन संजय काळे यांनी शेवटी केले आहे.आपल्या स्वखर्चातून आपण हा लढा लढवत असल्याची माहिती त्यांनी शेवटी दिली आहे.
शेवटी उपस्थीतांचे आभार अड.अजिंक्य काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.