शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठा विकास झाला ,मोठा विकास झाला असा डांगोरा पेटवला जातो. मात्र साधा नगर मनमाड रस्ता सुद्धा झाला नाही. येथील अनेक तरुण बेरोजगार आहेत. आपल्या शैक्षणिक संस्था सोडून दुसरीकडे शैक्षणिक संस्था होऊ नये म्हणून प्रयत्न केला जातो. हा विकास आहे का? असा सवाल शिर्डी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी केला आहे.
डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्यापुढे कोणीही मोठा होऊ नये म्हणून सातत्याने विखे परिवार प्रयत्न करीत असतो. साम दाम दंड मत भेद असे सर्व प्रकार वापरून आपल्यापेक्षा मोठा होत असणाऱ्या नेत्याला खच्ची केले जाते. आणि वरून आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करतो. असे दाखवण्याचा खोटा प्रयत्न होतो.
नगर मनमाड रस्ता अनेक दिवसापासून अत्यंत खराब असतानाही निवडणुका आल्या की फक्त वरवर डागडुजी केली जाते. या खराब रस्त्यामुळे अनेकांचे आतापर्यंत जीव गेले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र त्याचे कोणालाही सोयर सुतक नाही. शिर्डीत साई मंदिरात फुले हार यांना परवानगी मिळाली. त्यासाठी आपण उच्च न्यायालयात पिटीशन दाखल केली होते. मात्र विखे परिवार आमच्यामुळेच न्यायालयाने परवानगी दिली ,
असे म्हणत श्रेय घेण्याचा एकटेच प्रयत्न करीत आहेत. मात्र सुज्ञ नागरिक मतदारांना हे सर्व माहित आहे. त्यामुळे या धनशक्ती विरोधात जनशक्ती म्हणून आपण लढा देत आहोत. आपण आपला माणूस हक्काचा माणूस म्हणून मला मतदान करून या निवडणुकीत विजयी करावे. मी आपले प्रश्न समस्या ग्राउंड लेव्हलला राहून नक्कीच सोडवल्याशिवाय राहणार नाही,
कारण आपण राहता नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व जनतेने हे पाहिले आहे. त्यामुळे यावेळी सर्व मतदारांनी, महिला भगिनींनी रिक्षा या चिन्हावर शिक्का मारून आपणास भरघोस मतांनी विजयी करावे. असे आवाहनही डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी या पत्रकातून केले आहे.