Letest News
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड... saibaba mandir news नाताळ व नवीन वर्षाच्या तयारीसाठी साईबाबा संस्थान कडून तयारी यूपी योद्धा प्रो कबड्डी लीग च्‍या टिमने श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले अपघातात मयत झालेल्या अनोळखी व्यक्तींच्या ओळखीसाठी संपर्क साधण्याचे एमआयडीसी पोलिसांचे आवाहन! शिर्डीत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन साईभक्त महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईल लंपास! धूम स्ट... अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी! शिर्डीतील एका क्रीडा शिक्षिकेने पुणे महापालिकेच्या बसमध्ये दारुड्या प्रवाशाला दिला चोप! महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे ...
अ.नगरशिर्डी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात! निवडणूक मतदानाची प्रक्रिया सज्ज!

शिर्डी, दि. १९ :- भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिर्डी विधानसभा मतदारसंघात बुधवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २७८ केंद्रांवर होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथके पोलीस बंदोबस्तात रवाना झाली. मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकांशी निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मनावर कोणतेही दडपण न घेता आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना श्री. आहेर यांनी केल्या.शिर्डी विधानसभा मतदारसंघात १०८ ठिकाणी असलेल्या २७१ मतदान केंद्रावर १ हजार ६०० अधिकारी – कर्मचाऱ्यांचे मतदान पथकांना राहाता तालुका प्रशासकीय भवन येथे उभारण्यात आलेल्या २१ टेबलच्या माध्यमातून बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएमसह मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. २८ बसेस व ७८ जीप मधून मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना झाले.

याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, बाळासाहेब मुळे, मनोज भोसेकर, मुख्याधिकारी वैभव लोंढे आदी उपस्थित होते.शिर्डी लोकसभा मतदारसंघात ८ उमेदवार निवडणूक लढवीत असून एकूण २ लाख ९२ हजार ९११ इतके मतदार आहेत.

यात १ लाख ४९ हजार ३९९ पुरूष मतदार आहेत. १ लाख ४३ हजार ५०४ स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथीय ८ मतदार आहेत. सेनादलातील २४१ मतदार आहेत. मतदानादिवशी पहाटे साडेपाच वाजता सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोलची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल.

मतदान प्रक्रियेत मतदारांना सहकार्य व्हावे म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची सुविधा असणार आहे. वेटींग रुम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत पुरवठा अदि सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. एनएसएस व एनसीसीचे १८ वयापेक्षा कमी वयाच्या स्वयंसेवकांची नेमणूका करण्यात आल्या आहेत.

सुमारे ८०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मतदान केंद्रांवरील सुरक्षाकामी सुमारे ४०० पोलीस कर्मचारी व ४०० केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल (सीएमपीएफ) च्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा व्यवस्थेकामी नियुक्ती करण्यात आली आहे.शिर्डी विधानसभेतील प्रत्येक बुथवर गरजेनुसार २ सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. ११ पथकांच्या माध्यमांतून पेट्रोलिंग केली जाणार आहे.

मतदान केंद्रांच्या हालचालींवर बारीक लक्ष

शिर्डी विधानसभेतील २७१ मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्राचे लाईव्ह वेबकॉस्टींग करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील पडद्यावर (स्क्रीनवर) ही लाईव्ह वेब कास्टिंगच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबर रोजी २०२४ रोजी सकाळी ५.३० वाजेपासून राखीव कर्मचाऱ्यांची टीम क्षणा – क्षणाला मतदान केंद्रावरील हालाचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहेत.

शिर्डी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असून अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात १०८ ठिकाणी असलेल्या २७१ मतदान‌ केंद्रात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राहता तहसील कार्यालयातून ३८ बसेस व ७८ जीप मधून मतदान केंद्रावर पथके पोहली आहेत. शिर्डी मतदारसंघात एकूण 1355 कर्मचारी असून चारशे पोलीस व चारशे होमगार्ड असे सुरक्षा दल तैनात
आहेत.
तरअकोले विधानसभा मतदारसंघात ३०७ मतदान‌ केंद्र असून मतदान कर्मचारी संख्या – १५३५ मतदान कर्मचारी आहे.
तर सुरक्षा‌‌ कर्मचारी – सुमारे ३०४ पोलीस कर्मचारी व २८७ होमगार्ड कर्मचारी (मतदान केंद्रांवर जाणारे)आहेत.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र – 272 आहेत.व
मतदान कर्मचारी संख्या – 1200 असून येथे सुरक्षा‌‌ कर्मचारी – सुमारे 350 पोलीस कर्मचारी व 350 केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल (CAPF) कर्मचारी‌ तैनात करण्यात आले आहेत.
तसेच नेवासा विधानसभा मतदारसंघात 134 ठिकाणी 276 मतदान‌ केंद्र असून
मतदान कर्मचारी संख्या – 1824 आहे.तर सुरक्षा‌‌ कर्मचारी – 1 dysp, 3 PI, 12 API / PSI , 225पोलीस कर्मचारी, 264 होमगार्ड व 12 हाफ सेकशन केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल (CAPF) कर्मचारी मायक्रो ऑब्जवर – 6 आहेत.श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात 87 ठिकाणी311 मतदान केंद्रे असून 44 बसेस व 24 जीप मधून मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी पथके पोहचली आहेत.मतदान कर्मचारी संख्या – 1730 आहे.तर सुरक्षा‌‌ कर्मचारी म्हणून 568 पोलीस कर्मचारी व होमगार्ड 75 ,केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल (CAPF) कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मतदारांनी मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जावू नये. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या २० नोव्हेंबर रोजी आपला मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. आहेर यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button