मतदानाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मोठे भाष्य केले आहे. जरांगे यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचं. आपल्या लेकराच्या बाजूने असेल त्याच्या बाजूने 100 टक्के मतदान करावे. मतदान करताना आपल्या लेकाचा आणि लेकीला विचारून मतदान करावं.
जाहिरात
पुढे जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्याला सोडू नका. आपल मत विजयाच्या बाजूने पडल पाहिजे. कोणी माझ्याबाजूला फोटो काढला याचा अर्थ मी कोणाला पाठिंबा दिला असा त्याचा अर्थ होत नाही.
कोणी संभ्रम निर्माण करेल मी कुठेही टीम पाठवली नाही. कुठेही मेसेज पाठवला नाही. मराठा समाजाने संभ्रम करून घेऊ नका तुम्हीच मालक आहेत. आपला कोणालाही पाठिंबा नाही मालक मराठा समाजाला ठेवलं, असेही जरांगे यांनी म्हटले.