शिर्डी (प्रतिनिधी)शिर्डी शहरात साई दर्शनासाठी आलेल्या परराज्यातील महिलेचे 17 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याची चैन अज्ञात भामट्याने धूमस्टाईलने ओरबाडून शिर्डीत चोरी केली आहे.
चेन्नई ( तामिळनाडू) येथील साईभक्त कविता देवराज ( वय ४८ )ही महिला साई दर्शन घेऊन साई मंदिरापासून जवळच असलेल्या साई कॉम्प्लेक्स समोर असलेल्या शौचालयासमोरील रस्त्यावरून पायी जात असताना १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ ,३० वाजेच्या सुमारास ती पायी जात असताना
पाठीमागून पायी चालत आलेल्या अंगात राखाडी रंगाचा जॅकेट घातलेल्या व काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या तरुणांने अचानक या फिर्यादी महिलेच्या गळ्याला हिसका देऊन गळ्यात असलेल्या सोन्याच्या चैन व मनी मंगळसूत्राला हिसका मारून १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन ओरबाडून अज्ञात चोरटा भरधाव वेगाने पळून गेला. आपण घाबरून गेले. आरडा ओरड केली असता या चोरट्यांने माझ्या गळ्यात असलेली सोन्याची चैन किंमत अंदाजे एक लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोने अज्ञात चोरट्यांने पळवून नेले.
अशी अशायाची फिर्याद शिर्डी पोलीसात दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ६२९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या घटनेने शिर्डी शहरात खळबळ उडाली असून साई भक्तांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा आधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहे.