शिर्डी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, मतदान प्रक्रिया काही किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यामध्ये शांततेत पार पडल्या. शिर्डी मतदार संघामध्ये ही विधानसभेचे मतदान प्रक्रिया अगदी शांततेत व कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली. शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री शिरीष वमने , व पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर व गावागावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चारशे पोलीस कर्मचारी व 400 सशस्त्र दलाचे जवान असा 800 सुरक्षा कर्मचाऱ्यांची फौज मतदार संघात निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आली होती. बुधवारी मतदान सकाळी सात वाजता सुरू होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत मोठ्या शांततेत संपन्न झाले. यादरम्यान शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री शिरिष वमणे व पोलीस निरीक्षक कुंभार साहेब यांनी ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर भेटी दिल्या. पाहणी केली.
तैनात असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या. शिर्डी मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर व पोलीस अधिकारी ,कर्मचारी, निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने तसेच सर्व उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने ह्या निवडणुका शिर्डी मतदार संघात शांततेत पार पडल्या असून आता निवडणूक निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे.
निवडणूक निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली असून मोठा बंदोबस्त मतमोजणीच्या ठिकाणी व बाहेर ठेवण्यात येणार आहे.