शिर्डी ( प्रतिनिधी )- मी फक्त निमित्तमात्र आहेत बाकी सर्व काही बाबा करून घेतात असं ठणकावून सांगणाऱ्या युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते यांच्या पुढाकाराने एक वर्षांपूर्वी दिलेल्या शब्द पूर्ण करत शिर्डीतील साई आश्रया अनाथाश्रमाकडे जाणाऱ्या खड्डेमय रस्त्यावर मुरूम टाकून तयार करून दिला.त्यांच्या या कामाचे सर्वच स्थरातून सोशल मीडियावर अभिनंदन आणी पाठीवर कौतुकाची थाप पडत आहे.
दरम्यान श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत बाबांच्या अकरा वचणं आणी दिलेल्या संदेशाचे पालन करण्यासाठी करोडो भाविक साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत फुल न फुलाची पाकळी म्हणून सेवा देण्यासाठी सरसावत असतात. मात्र युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वात मोठा शिवजयंती उत्सव याव्यतिरिक्त अनेक छोटे मोठे सामाजिक उपक्रम राबवत असतात.यामध्ये रक्तदान शिबीर,
तसेच एखाद्या गरीब रुग्णाला शश्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत, साई भक्तांसाठी सेवा अशा अनेक उदाहरणं आहे.पिंपळवाडी रोडलगत असलेल्या साई आश्रया अनाथ आश्रमात जाण्यासाठी रस्त्याची खूपच दुरावस्था झाली होती.पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून खड्डे पडले होते.येथील लहान मुलं तसेच वृद्धाना उपचारासाठी रुग्णावाहिकेतून घेऊन जाणे कठीण होते.ही बाब जेव्हा युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या नितीन कोते यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मागील वर्षी आश्रमाचे संचालक दळवी
यांना सदरचा रस्त्यावर मुरमीकरण करून देणार असा शब्द दिला होता, आज अखेर या दिलेला शब्द पूर्ण करत रस्त्यावर 75 हजार रुपयांचे 13 ढम्पर मुरूम टाकून पाणी मारण्यात आले. त्यावर रोलर फिरवून रस्ता तयार करून दिला. याचा युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या आम्हा सर्व सहकाऱ्यांना आनंद झाल्याचे मत व्यक्त करत आमच्या कडून हे सर्व साईबाबा करून घेतात असा विश्वास नितीन अशोक कोते यांनी व्यक्त केला.याकामी संघटनेचे विकास गोंदकर,किरण कोते आदिसह सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.