शिर्डी, दि.२८ – नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहनधारक पसंतीक्रमांक शुल्क आता ऑनलाईन भरता येणार असून या सुविधेचा लाभ वाहनधारकांनी घ्यावा, असे आवाहन श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.
जाहिरात
नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहनधारक परिवहन कार्यालयात येऊन पसंती क्रमांक शुल्क भरणा करून त्यांच्या वाहनांकरिता पसंती क्रमांक घेत असतात. २६ नोव्हेंबर २०२४ पासून शासनाने parivahan.gov.in या संकेतस्थळावर पसंती क्रमांक शुल्क ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचेही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.