नांदेड जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी घटना वाघी रोड वरील दार-ए-अरखाम या मदरशामध्ये घडली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलिसांनी मौलानासह मदरसा चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असल्याची माहिती आहे. शहरातील एका मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलासोबत मौलानाने अनैसर्गिक अत्याचार केला.
या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी अशी की, नांदेड शहराजवळच्या वाघी रोड हस्सापुर येथे दार – ए – अरखांम नावाने मदरसा चालवला जातो. या मदरशात जवळपास ३० मुले निवासी राहून धार्मिक शिक्षण घेतात. अन्य मौलानासह मूळचा बिहार येथील २६ वर्षीय महोमद शाहनवाज हा मौलाना देखील मुलांना शिक्षण देतो.
दोन दिवसापूर्वी आरोपी मौलाना महोमद शाहनवाज याने एका दहा वर्षीय मुलावर नैसर्गिक अत्याचार केले. त्रास होत असल्याने पीडित मुलाने मदरशा बाहेरील पानटपरी चालकाला हा प्रकार सांगितला आणि मौलानाचा क्रूर प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर कुटुंबियानी वाजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.