दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केलीये. फेरमतमोजणीची मागणीही काही उमेदवारांनी केली असून हळूहळू या निकालाला विरोध वाढताना दिसत आहे. अशातच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ९५ वर्षाीय बाबा आढाव यांनी यासंदर्भातच आत्मक्लेष आंदोलन सुरू केलं आहे. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आढाव यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला.
आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास हा विषय आणला आहे. बाबा आढाव यांच्यासारखा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ईव्हीएमच्या घोटाळ्याविरूद्ध लोकशाही वाचवण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करत आहे याची जाणीव महाराष्ट्राच्या जनतेने ठेवावी. भले अण्णा हजारे झोपले असतील अन्य सगळे लोक जे ऐरवी क्रांतीच्या मशाली पेटवतात ते झोपले असतील पण लोकशीहीची मशाल विझू नये म्हणून बाबा आढावांसारखा नेता रस्त्यावर उतरला आहे याची आम्ही जाणीव ठेवतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.