शिर्डी( प्रतिनिधी) महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर यांनी आज शनिवारी शिर्डीला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. साई दर्शननंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थान च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी श्री साई मूर्ती व शाल देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते.
राहुल नार्वेकर हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. ते सध्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आणि महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत. नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली आहे.
सध्या विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. महायुतीला यश मिळाले आहे. त्यामुळे आता विधानसभेत सर्व आमदारांचा शपथविधी होणार आहे तसेच मंत्रिमंडळ ही स्थापन होणार आहे. विधानसभेत नवनिर्वाचित आमदार आलेले आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपदी नव्याने अध्यक्षांची नियुक्ती लवकरच होईल असे संकेत आहेत.
परत एकदा विधानसभेचे अध्यक्षपदी आपल्याला विराजमान होऊ दे! असे मनोमन साकडे देखील राहुल नार्वेकर यांनी साई चरणी घातले असावेत अशीही चर्चा आहे.