शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथे
श्री साईबाबा मंदिराचे नवीन दर्शन कॉम्प्लेक्स चे आरोग्य कर्मचारी श्री बाबासाहेब कोळे यांना परिसरात एक डायमंड असलेली सोन्याची अंगठी सापडली. सोनाराने अंगठीची किंमत 27,000/- रु असल्याचे सांगितले. त्यांनी अंगठी प्रामाणिकपणे कुठलाही मोह न ठेवता संरक्षण कार्यालयात जमा केली. नमूद आरोग्य कर्मचारी हे आऊटसोर्स चे आहेत.
त्यांना मासिक 12000/- रु पगार आहे.पण त्यांचा प्रामाणिकपणा अमूल्य आहे. त्यांच्या या प्रामाणिक पणाची पदाची दखल घेत श्री साईबाबा संस्थान चे मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीपकुमार भोसले यांचे हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. असे संस्थांनचे अनेक प्रामाणिक कर्मचारी आहेत .
आतापर्यंत साई भक्तांच्या हरवलेल्या वस्तू ,गहाळ झालेल्या वस्तू त्यांना सापडल्यानंतर त्यांनी संरक्षण विभागात जमा करून व मध्यमा द्वारे त्या हरवलेल्या वस्तूंची अलाउन्समेंट करून त्या साई भक्तांना परत ओळख पटवून मिळवून दिलेल्या आहेत.