शिर्डी ( प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील चुरशीच्या व प्रतिष्ठित अशा समजल्या जाणाऱ्या
संगमनेर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी आज रविवारी सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मंदीर प्रमुख विष्णु थोरात यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते.
संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व चाळीस वर्षे सत्तेत असणारे आमदार बाळासाहेब थोरात यांना पराभूत करून विजयी झालेले जॉईंट किलर समजले जाणारे आमदार अमोल खताळ यांनी आज रविवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत त्यांचा परिवार ही होता.व कार्यकर्त्यांचा मोठा गराडाही त्यांच्या समवेत होता.
आ.अमोल खताळ यांनी डोक्यात भगवी टोपी घातलेली होती. ही भगवी टोपी एका कार्यकर्त्यांनी दिलेलीअसून ती त्यांची एक आता ओळख झाली आहे. आमदार अमोल खताळ यांना शिर्डीत अनेकांनी प्रत्यक्ष भेटून हस्तांदोलन किंवा गळा भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.
तसेच चाहते ,कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. आपण अनेकदा शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आलो. निवडणूक निकाला अगोदरही दोन दिवस दर्शनाला येऊन गेलो होतो. साईबाबांचा आशीर्वाद घेतला होता. साईबाबांचा आपण निस्सिम भक्त असून माझ्या व्यवसायालाही साईबाबांचेच नाव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.