शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा लॉयन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ शेजवळ यांचा वाढदिवस वायफळ खर्चाला फाटा देत शिर्डी येथील साई आश्रया अनाथ आश्रमात साजरा करण्यात आला. वाढदिवस म्हटला की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मोठा खर्च केला जातो. डामडौलात वाढदिवस साजरा केला जातो.
अशा या वायफट खर्चाला फाटा देऊन संदीप भाऊ शेजवळ यांनी साई अनाथ आश्रमात जाऊन तेथील लहान अनाथ मुलांबरोबर केक कापून व येथील अनाथ मुलांना मिठाई देत व अन्नदान करत आपला वाढदिवस साजरा केला. त्यामुळे या अनाथ मुलांनाही मोठा आनंद वाटला.
या अनाथ आश्रमात अनाथ मुले यांच्यासोबत असं वाढदिवस साजरा केला की त्या मुलांच्या चेहऱ्यावर एक आनंद फुलतो हा आनंद त्यांच्या जीवनाला वेगळी कलाटणी देणार असतो म्हणून प्रत्येकाने अशा अनाथ आश्रमात आपला वाढदिवस साजरा करावा
असे यावेळी संदीप भाऊ शेजवळ यांनी सांगितले.शिर्डीचे सामाजिक कर्यकर्ते नितीनभाऊ अशोकराव शेजवळ, निलेश धिवर ,ऍड. आसने ,वंचित आघाडीचे प्रवीण आल्हाट, आदित्य शेजवळ ,आकाश शेजवळ, बाबासाहेब दिवे ,साई त्रिभुवन, शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष बाबा दिवे, मॉडेल ग्रुपचे अध्यक्ष साई त्रिभुवन, डायमंड ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र शेजवाळ, राजेंद्र गुजाळ तसेच मित्र परिवार यावेळी उपस्थित होते.