शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी येथील सचिन विश्वनाथ काळे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये येऊन आरडा ओरड करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी , शिर्डीचे सपोनी संदीप अशोक हजारे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की, ,दि, 03/08/2024 रोजीच्या सचिन विश्वनाथ काळे यांनी दिलेला तक्रारी अर्ज चौकशी वर असताना व या अर्जाची प्रथम चौकशी सपोनि कादरी यांनी केलेली आहे.
सदर अर्जाची अवलोकन करता सदरचे अर्ज दिनांक 09/03/2024 रोजी पोलीस स्टेशन शिर्डी येथे दाखल आहे. दिनांक 02/09/2024 रोजी अहवाल मा. आधिष्ठाता सौ. ससुन हॉस्पीटल पुणे यांना पाठवलेला असुन दिनांक 22/11/2024 रोजी मा. वैदयकीय संचालक श्री साईबाबा हॉस्पीटल शिर्डी ता. राहाता जि. आहील्यानगर यांना पत्र सादर केले आहे.तरीही सुमारे तीन महीने काळात अर्जदार सचिन विश्वनाथ काळे रा. शिर्डी ता. राहाता जि. अहील्यानगर
हा वेळोवेळी पोलीस स्टेशनला येवुन त्यांनी दिलेल्या अर्जावरुन पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार व पोलिसांना वेळोवेळी शिवीगाळ करुन पोलीस स्टेशनला आरडाओरडा करुन असंभ्य पणाचे वर्तन केलेले आहे. तसे त्यांची वेळोवेळी स्टेशन डायरीला नोंदी घेतल्या आहे. दिनांक 22/11/2024 रोजी सायंकाळी सहा वाजे सुमारासही आम्ही आमच्या कार्यालयात येत असताना अर्जदार सचिन विश्वनाथ काळे रा. शिर्डी ता. राहाता जि. आहिल्यानगर
हा आम्हास पाहून धावत माझ्या समोर येवुन आम्हास आडवा झाला व मला मोठयाने ये हजारे माझ्या अर्जाचे काय केले तो असे मोठ्याने बोलु लागला .त्यांवर त्यांना मी तुमच्या अर्जाची चौकशी चालु आहे .आजच रिपोर्ट दाखल केला आहे. असे समजावुन सांगत असताना त्यांनी आम्हाला शिवीगाळ करुन आमचे अंगावर मारण्यास धावला व आम्हास शिवीगाळ करु लागला त्यानंतर पोलीस निरिक्षक श्री कुंभार सो यांच्या नावाने एक दीड तास मोठमोठ्याने आरडाओरड करुन त्यांचे नावाने शिवीगाळ करु लागला.
त्यानंतर पोलीस निरिक्षक सो हे पोलीस स्टेशनला आले असता त्यांना पण शिवीगाळ करु लागला .त्यानंतर सचिन काळे यांने त्यांची पत्नी नामे उमा सचिन काळे यांना फोन करुन पोलीस स्टेशनला बोलावुन घेतले. त्यांनीही त्यांस समजावुन सांगितले .पंरतु त्यांने त्यांचे एकले नाही .पोलीस निरिक्षक कुंभार सो हे पो.स्टेला हजर असताना त्यांना व हजर असलेले पोलीस अंमलदार यांना ही मोठमोठ्याने शिवीगाळ करुन त्यांचे अंगावर मारण्यास धावला.
त्यावेळी मी व पोलीस स्टेशनचे सपोनि बल्लैया व पोलीस अंमलदार पोहेकॉ खेडकर, पोहेकों/दातीर, पोना/उजागरे, पोकॉ/घुले, पोकॉ/गरदास, मपोकों/टोपे, मपोकॉ घॉनशेटवाड व इतर अंमलदार त्यांस समजावुन सांगु लागले. त्यावेळी सर्व पोलीस आधिकारी व अंमलदार यांना शिवीगाळ तो करु लागला .त्यांवेळी पोलीस निरिक्षक कुंभार सो यांनी घटणेची चित्रीकरण त्यांचे मोबाईल मध्ये शुंटीग केली आहे.
तरी दिनांक 22/11/2024 रोजी 18/00 वा ते 21/45 वा दरम्यान मी व पोनि/कुंभार सो, सपोनि/बलैय्या पोहेकों/खेडकर, पोहेकों/दातीर, चापोना/उजागरे, पोकों/घुले, पोकों/गरदास, मपोकॉ/टोपे, मपोकॉ/घोनशेटवाडअंम लदार असे हजर असताना सचिन विश्वनाथ काळे याने पोलीस स्टेशन मध्ये येवून सहा ते नऊ पंचेचाळीस दरम्यान आरडाओरड करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. म्हणून माझी सचिन विश्वनाथ काळे रा. शिर्डी ता. राहाता जि. आहिल्यानगर
यांच्याविरुध्द भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 132,352 प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे. अशा आशयाची फिर्याद सपोनी संदीप अशोक हजारे यांनी दाखल केली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस स्टेशनला सचिन विश्वनाथ काळे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 636 /2024 नुसार भादवि कलम 132 /352 नुसार दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहेत.