शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी व परिसरात गुरुवारी उशिरा रात्री बाराच्या दरम्यान ठिकठिकाणी पाऊस पडला. गेली दोन दिवस ढगाळ वातावरण होते .त्यामुळे थंडी गायब होऊन दमट वातावरण तयार झाले होते. गुरुवारी रात्री उशिरा बारा एकच्या दरम्यान सावळीविहीर परिसरात चांगला पाऊस सुरू झाला. त्यामुळे दिवसभर दमट वातावरण काहीसे हलकेसे झाले.
गेले दोन दिवसा पूर्वी कडाक्याची थंडी पडली होती .मात्र अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. हवामान खात्यानेही ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र गुरुवारी रात्री सावळीविहीर परिसरात पाऊस पडला. पावसामुळे काहीसे हलके वातावरण झाले असले तरी हिवाळात पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झालेचे दिसून येत होते.
ढगाळ वातावरणामुळे पिकांवरही अनेक रोग पडतात. त्यामुळे शेतकरीही काळजीत पडले आहे. कधी थंडी तर कधी दमट असे वातावरण निर्माण झाल्याने लहान मुले , वृद्धही आजारी पडत आहेत.नगरच्या काही भागांमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण होते आणि वातावरणातही थंडी गायब होऊन उष्णता वाढली होती. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज पावसाने हजेरी लावली आहे.
पुढील 24 तासांचा अंदाज घ्यायचा झाल्यास राज्याच्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पश्चिम क्षेत्राला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्येही पावसाच्या हलक्या सरींची हजेरी पाहायला मिळेल असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.