शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मध्ये साई संस्थांनच्या प्रवेशद्वार समोर साईबाबा मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना मध्येच रस्ता अडवून तुम्हाला साईबाबा मंदिरात दर्शन करून देतो व आम्ही सांगतो त्या प्रसादाच्या दुकानांमध्ये प्रसाद घ्या ,असे सांगून त्यांचा रस्ता अडवून पुढे जाण्यास प्रतिरोध करीत असताना पाच जण आढळून आले असून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून तशी मोहीम सुरू करण्यात आली आहे
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश सूर्यवंशी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हटले की, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली
दिनांक. ३० नोव्हेंबर रोजी मी तसेच सपोनि भारत बलैया व पोलीसांचे पथक साईबाबा मंदीर परीसर गेट नं.१ समोर पायी पेट्रोलींग करीत असतांना दुपारी ३ वा. सुमारास काही इसम तेथे पायी जाणारे भाविक जाणारे भाविकांचा रस्ता अडवून,
त्यांना म्हणत होते की तुम्हाला श्री. साईबाबा मंदिरात दर्शन करुन देतो व आम्ही सांगतो त्या प्रसादाच्या दुकानामध्ये प्रसाद घ्या असे सांगून त्यांचा रस्ता अडवुन पुढे जाणेस प्रतिरोध करीत असतांना आम्हाला दिसले. आम्ही त्यांना तात्काळ जागीच पकडून त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नावे प्रसाद संजय आरणे वय-२४ वर्षे रा.मु.पो.को-हाळे ता. राहाता आकाश बाळासाहेब भडकवाड वय-३० वर्षे रा. पिंपळवाडी ता. राहाता
संदिप मारुती कोळगे वय ३३ वर्षे रा. रुई ता. राहाता ४ भाऊसाहेब दादा थोरात वय-४७ वर्षे रा. रयत शिक्षण संस्था शाळेसमोर पुणतांबा ता. राहाता सुरेश छगनराव अडबोले वय-४० वर्षे रा. कालीकानगर शिर्डी ता. राहाता असे असल्याचे सागितले.
हे तेथे पायी जाणारे भाविकांचा रस्ता अडवून, त्यांना म्हणत होते की तुम्हाला श्री. साईबाबा मंदिरात दर्शन करुन देतो व आम्ही सांगतो त्या प्रसादाच्या दुकानामध्ये प्रसाद घ्या असे सांगून त्यांचा रस्ता अडवुन पुढे जाणेस प्रतिरोध करीत असतांना मिळून आले आहे.
माझी त्यांचे विरुद्ध भारतीय न्यांय संहीता २०२३ चे कलम १२६(2) प्रमाणे फिर्याद आहे. या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर ६५१ /२०२४ नुसार भादवी कलम १२६ ( २) ३ ( ५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस करत आहेत.