शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी शहरातील कालिका नगर भागात भर दिवसा एका घरात चोरी झाली असून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण एक लाख 26 हजार रुपये मुद्देमाल चोरी गेला आहे.
या घटने संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कलिका नगर शिर्डी येथील रहिवासी असणाऱ्या
साक्षी दिपक साळुंके( वय 40 वर्षे) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
की,दिनांक 18/11/2024 रोजी मी सकाळी 07/00 वा. चे सुमारास डाळींब विक्री करण्याकरीता श्री. साईबाबा मंदिर परिसरात गेले व माझे पती नेहमी प्रमाणे सकाळी 10/00 वा.च्या. सुमारास त्याच्या मोरील फेबरीक्रेशनचा दुकानात गेले. माझी मोठी मुलगी संस्कृती व लहान मुली असे 10/30 वा शाळेत गेले. व मी मंदिर परिसरात असताना माझे पती दिपक साळुंके यांचा दुपारी 01/30 वा.च्या. सुमारास मोबाईलवर फोन आला व त्यांनी मला फोनवर सांगितले की
, तु घराला कुलूप लावले नव्हते का, घराचा दरवाजा उघडा असुन घरात सामान अस्ताव्यस्त पडलेले होता. कपाट उघडे होते व घराचा कुलुप टेबलावर दिसुन आले.तेव्हा मी माझ्या घरात लाकडी कपाटात असलेला लोखंडाच्या डब्बा उघडा व तोडलेला दिसला .त्यामध्ये असणारे 1)90,000/- रु. रोख रक्कम त्यात 500, 200,100,50,20,10 दराच्या चलनी नोटा
2) 12,000/- रु. कि.ची. पाच ग्रॅम वजनाची दोन पड्या असलेली सोळा मनीची सोन्याची व त्यात काळे मनी असलेली पोत जु.वा.कि.अं.
3) 15,000/- रु कि.ची सात ग्रॅम वजनाची साईबाबाची प्रतिमा असलेली सोन्याची अंगठी जु.वा.कि.अं. 4)9,000/- रु.कि.ची. दोन ग्रॅम वजनाचा सोन्याचे पॅन्डल त्यावर गणपतीचे प्रतिमा असलेले जु.वा.कि.अं. असे 1,26,000/- रु एकूण सोने व रोख रक्कम मुद्देमाल चोरी गेला आहे.
तरी दिनांक 18/11/2024 रोजी सकाळी 10/00 ते दुपारी 01/30 वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी माझ्या संमतीशिवाय स्वताचे फायद्याकरीता, लबाडिच्या इराद्याने माझ्या राहते घरातील लाकडी कपाटातील वरील वर्णानाचे व किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली आहे. म्हणून माझी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद आहे. फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 631/ 2024 नुसार भादवि कलम 305 (ए )331 (तीन) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस करत आहेत.