शिर्डी (प्रतिनिधी) नाशिक येथील प्रभारी सहाय्यक कक्षाधिकारी लोकसेवक रविंद्र शामराव सोनार यांना दहा हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार हया धुळे येथील शाळेत प्रभारी मुख्याध्यापिका असुन,
त्यांचे शाळेच्या संदर्भात राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक कार्यालय, नाशिक येथे केंद्रीय माहितीचा अधिकार सन २००५ चे अनुषगाने द्वितीय अपिल क ९१/२०१५/धुळे या प्रकरणाचे संबंधाने तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रू दंड न करता तक्रारदार यांचे बाजुने निकाल देवून सदर अपिल निकाली काढण्यासाठी १५,०००/- रू लाचेची मागणी करीत असल्याने तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, धुळे येथे लेखी तक्रार दिली होती
त्यानुसार दि.०५/०५/२०१७ रोजी राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक कार्यालय येथे पडताळणी करता, लोकसेवक रविंद्र शामराव सोनार यांनी महिला तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती १०,०००/- रू. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दि.०६/०५/२०१७ रोजी राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक कार्यालय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वाराचे जिन्याजवळ सापळा लावण्यात आला असता,
लोकसेवक रविंद्र शामराव सोनार, सहायक कक्ष अधिकारी (प्रभारी कक्ष अधिकारी), राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांनी महिला तक्रारदार यांचेकडुन पंच साक्षीदार यांचे समक्ष १०,०००/- रू. लाच स्विकरल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदर कारवाई मा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अॅन्टी करप्शन ब्यूरो, नाशिक व पोलीस उप अधीक्षक श्री. सुनिल गांगुर्डे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. पवन प्र. देसले व धुळे अॅन्टी करप्शन ब्युरोचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदरची कारवाई केली आहे.
भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी करश्यपन ब्युरो, धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.