शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील
श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी तात्पुरता बदल करण्यात आला आहे. हा बदल फक्त 20 डिसेंबर 2024 रोजी राहणार आहे.
शिर्डी येथील“श्री साईबाबा समाधी मंदिरातील श्री साईबाबांच्या संगमरवरी (इटालीयन मार्बल) मूर्तीची थ्रीडी स्कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित करणेकामी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय (CSMVS), मुंबई यांनी सुचित केलेप्रमाणे स्थापन करणेत आलेल्या विविध तज्ञ समिती मधील सदस्य दि.२०/१२/२०२४ रोजी शिर्डी येथे येऊन श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देवून पाहणी करणार आहेत. त्यामुळे दि.२०/१२/२०२४ रोजी दुपारी ०१.४५ ते ०४.३० या वेळेत समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.
याची सर्व ,भाविक भक्तांनी नोंद घ्यावी व त्यानुसार आपली यात्रा योजना आखावी, ही विनंती. आपल्या सहकार्याबद्दल श्री साईबाबा संस्थान आपले आभारी आहे”. असे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.