शिर्डी ( प्रतिनिधी)प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी शिर्डीला भेट दिली.
साईमंदिरात जाऊन त्यांनी साईबाबा समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
साईदर्शनानंतर साई संस्थानचे वतीने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचा साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला.
यावेळी प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी, मंदिर विभाग पर्यवेक्षक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
आनंद महिंद्रा हे निसिम साईभक्त असून त्यांनी आतापर्यंत महिंद्रा अँड महिंद्राचे अनेक नवीन वाहने साई चरणी अर्पण केले आहेत.
महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने नुकतीच अत्याधुनिक तंत्राचा वापर करून जागतिक दर्जाची अशी इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे.
इलेक्ट्रिक कार लॉन्च झाल्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी शिर्डीला भेट दिली. साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. या नुकत्याच लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक महिंद्रा कंपनीच्या कार जगामध्ये यशस्वी व्हाव्यात, असे मनोमन त्यांनी साई चरणी साकडे घातल्याचे साईभक्त व ग्रामस्था मधून यावेळी बोलले जात होते.