शिर्डी (प्रतिनिधी)
श्री साईबाबा व साईबाबा संस्थान शिर्डी यांच्याबददल आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारीत केल्याबददल गौतम खत्तर तसेच सनातन संस्थेचे अजय शर्मा याच्या विरोधात शिर्डीचे निलेश मुकुंदराव कोते यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला सी आर पी सी कलम 154 (3) प्रमाणे लेखी फिर्याद दाखल केली आहे.
अगणित लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री. साईबाबांबाबत चुकीचं वक्तव्य करुन सोशल मिडियाच्या माध्यमातून साईबाबंविषयी चुकीचा संदेश प्रसारित करणाऱ्यां विरोधात शिर्डीच्या श्री साईबाबांचे समकालीन भक्त कै.बायजाबाई कोते व कै.तात्या पाटील कोते यांचे वारसदार यांच्याकडून शिर्डी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश मुकुंदराव कोते यांनी
या फिर्यादीत त्यांनी पुढे म्हटले आहे की, श्री साईबाबा यांच्याबद्दल युट्युबवर गौतम खत्तर यांनी अनेक व्हिडीओ प्रकाशित केलेले आहे..सदर व्हिडीओ मध्ये श्री साईबाबाबाबत अनेक चुकीचे वक्तव्य गौतम खत्तर याने केले असून कोट्यावधी साईभक्तांच्या भावना दुखावलेल्या आहेत.
सदर व्हिडीओ मध्ये श्री साईबाबा हे देव आहे का ? श्री साईबाबांची पुजा हिंदु च्या मंदीरामध्ये करणे योग्य आहे का? अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे. त्यावर गौतम खत्तर म्हणतात की, श्री साईबाबा हे अफगाणिस्तान मधुन आलेले आहेत व ते मुस्लीम समाजाचे आहे. त्यांचे नाव चाँद भाई आहे.
त्यांनी आपला चेला गोविंद दाभोळकर यांच्याकडुन आपले चरित्र लिहुन घेतले. व ते चरित्र साई संस्थान ने प्रकाशीत केले तसेच श्री साईबाबा अफगाणिस्तान मध्ये मुसलमानाचे पुत्र आहे.तसेच १२ वर्षाचे वय असताना त्यांना इग्रंजांनी पकडुन जेल मध्ये टाकले. व तडजोड करुन बाहेर आले. तसेच झासीच्या रानीला मारणेचे काम केले. तसेच लोकमान्य टिळक यांच्याकडे पाठवले. लोकमान्य टिळक यांनी श्री साईबाबाना मारले.
त्यानंतर श्री साईबाबा शिर्डीत आले व ते पाखंडी आहे. असा आक्षेपार्ह मजकुर त्यांनी मांडला आहे. त्यामुळे समस्त साईभक्तांच्या व शिर्डी ग्रामस्थांच्या भावना दुखवल्या आहे. यामुळे मला देखील सदर व्हिडीओ पाहुन सदर गौतम खत्तर यांच्याबद्दल प्रचंड व्द्बेश निर्माण झालेला आहे.
सदर गौतम खत्तर याने सदर व्हिडीओ हा युटयुब वर अपलोड करुन प्रसारीत केलेला आहे. सदर व्हिडीओ मध्ये त्यांनी श्री साई सतचरित्र या पवित्र ग्रंथाबददल देखील आक्षेपार्ह चुकीचा प्रसार केलेला आहे. या कारणांमुळे आमच्या भावणा दुखवल्या गेलेल्या आहे. सदर व्हिडीओ हा चुकीचा आहे.
व श्री साईबाबा बददल व श्री साईबाबा संस्थान बददल त्यांनी ज्या पध्दतीने वक्तव्य केलेले आहे. ते कोणाच्याही बुध्दीला पटनारे नाही. तसेच श्री साईबाबा बददल बांगलादेशमधील मशीदीमधील आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्कीग साईटवर व्हायरल होत आहे. त्यामध्ये काही मुसलीम गृहस्थ त्या मध्ये नोटा भरत आहे.
त्या व्हिडीओ वर कॅप्शन लिहुन’ शिरडी साई की झोली में डाली गई हिन्दुओं की कमाई कहाँ जा रही है खुद ही देख लो। इसको इतना वायरल करो कि देश के एक एक हिंदु तक पहुंचे जोकि आंखे होते हुए भी अंधे बने हैं? असे लिहुन सदरचा व्हिडीओ व्हायरल केलेला आहे. व्हायरल व्हिडीओ मध्ये नोटा या भारतीय चलनाच्या नाही. तसेच श्री साईबाबांच्या मंदीरामधील दान होणाऱ्या नोटा बहुतांश भारतीय चलनाच्या आहे.
तरी सदर व्हिडीओ व्हायरल करुन गैरसमज व श्री साईबाबाबददल व श्री साई संस्थान बददल गैरसमज पसरवले जात आहे. या कारणाने सदर दोन्ही व्हिडीओ ची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच सदर व्हिडीओ चुकीचे व बोगस असल्याने युटयुब, फेसबुक, अन्य सोशल नेटवर्कीग साईटवरुन काढुन टाकणे आवश्यक आहे.
त्यानंतर गेल्या २० ते २५ दिवसापासुन युटुब, फेसबुक तसेच इन्स्टाग्राम, व्हाटसअप व्दारे सध्या काही व्हिडीओ प्रसारीत होत आहे. त्यामध्ये श्री साईबाबा यांचे नाव चाँदमिया असे होते.तसेच त्यांची आई ही —- होती, त्यांनी राणी लक्ष्मीबाई यांची हत्या केली, तसेच हिंदुची सुनता केली. (धर्मातराला प्रोत्याहीत केले) व सुप्रीम कोर्टाने साईबाबा हे मुस्लीम असल्याचा निकाल दिलेला आहे. तसेच त्यांचे वडील हे दरोडे खोर (पेन्डारी) होते,
अशा स्वरुपाचे मजकुर असल्याचे तसेच श्री साईबाबा संस्थान यांनी आयोध्या येथील राम मंदीराच्या बांधकामासाठी निधी नाकारला व मशीदीसाठी पैसे दिले, अशा स्वरुपाच्या मजकुराचे व्हिडिओ प्रसारीत करत आहे. त्यामुळे आमच्या सारख्या अनेक साईभक्तांच्या भावणा दुखवल्या गेलेल्या आहे. तसेच सदर व्हिडीओ पाहुन वाराणसी येथील सनातन संस्थेचे अध्यक्ष अजय शर्मा व इतर काही व्यक्तीनी ज्या ज्या मंदीरामध्ये श्री साईबाबांची मुर्ती होती,
ती मुर्ती काढुन टाकलेली आहे. सदर व्हिडीओतील आक्षेपार्ह मजकुरामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. तसेच साईभक्त व इतर व्यक्तीमध्ये दुविधा मनस्थिती निर्माण झालेली आहे.
याकामी अनेक युटुब चॅनल टिव्ही वरील न्युज चॅनल तसेच फेसबुक पेज इन्स्टाग्रॅम पेज व व्हाटसअप ग्रुप व्दारे सदर व्हिडीओ हे शेअर केले जात आहे.
तरी सदरील अक्षेपार्ह व्हिडीओबाबत यापुर्वी देखील दि. १०/०६/२०२३ रोजी लेखी तक्रार अर्ज दाखल केलेला होता, सदर तक्रार अर्जावर कोणताही निर्णय झालेला नाही. तरी याबाबतची शहानिशा करावी व व्हिडीओ मधील मजकुर व्यक्त करणारे वक्ते तसेच व्हिडोओ शेअर करणारे संबंधीत व्यक्ती यांच्याबाबत सखोल चौकशी व्हावी .
सदर व्हिडीओ हे संबंधीत साईटवरुन कायम स्वरुपी डिलीट करण्यात यावे. तसेच श्री साईबाबांची विटंबना केली व धार्मिक भावणा दुखवल्या याबाबतीत व तसेच संबंधीतावर तातडीने गुन्हे दाखल होवुन कडक शासन व्हावे. असे फिर्यादीत म्हटले आहे.
त्याचप्रमाणे शिर्डीतील शिवसेनेचे कमलाकर कोते, विविध पक्षाचे संघटनेचे नेते ,साई संस्थान व साई भक्त या प्रकारामुळे ॲक्शन मोडवर आले असून यानंतरही अशा प्रकारासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. असे बोलले जात आहे.