शिर्डी (प्रतिनिधी) गाडीवर ड्रायव्हर म्हणून असणाऱ्या उत्तम मकासरे राहणार सावेडी अहिल्यानगर याने गाडी मालकाचा विश्वास संपादन करून गाडी मालकाच्या मित्राचे एक लाख रुपये आणि गाडीतले इतर सामानाचीही त्याने चोरी केली आहे. त्यामुळे वाहन चालकांमध्येही मोठी चर्चा होत आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील दिलीप दगडू भोसले यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,
माझेकडे अशोक लेलँण्ड
कंपनीचा आय 2LS चारचाकि वाहन क्र MH-17. CV-2898 असा आहे. त्या गाडीस मी जीपीएस ट्रॅकर प्रणाली लावलेली आहे. त्यावरुन मला माझ्या गाडीचे करंट लोकेशन मिळत असते. सदर चारचाकी मालवाहु वाहनावर उत्तम आगुस्तीन मकासरे रा. डॉनबास्को कॉलनी, सावेडी अहिल्यानगर हा माझ्या वाहनावर ड्रायव्हर म्हणुन कामाला आहे.
सदर मालवाहू वाहन हे भाडोत्री म्हणुन वापर करत असुन, अधुन मधुन सदरचे वाहन मी माझा मित्र अन्सार महेबुब पठाण रा. सह्याद्री चौक अहिल्यानगर यांना त्यांची एम आय डि सी अहिल्यानगर येथे असलेल्या साई पॉलीमर्स येथील ठिबक सिंचनच्या पाईपांची मालवाहतुक करण्याकरीता भाडोत्री देत असतो.
दिनांक -06/11/2024 रोजी दुपारी 200 वा.चे सुमारास माझा मित्र अन्सार महेबुब पठाण यांचा माझे मोबाईलवर फोन आला कि, तुझी गाडी मला भाडोत्री पाहिजे असुन गाडीमध्ये ठिबक सिंचनचे पाईप घेवुन ते नाशिक येथे घेवुन जायचे आहे .असा फोन आल्याने मी माझ्या गाडीवरील ड्रायव्हर उत्तम आगुस्तीन मकासरे यास संपर्क करुन माझी गाडी एम आय डि सी अहिल्यानगर येथे पाठविली. त्यानंतर माझ्या गाडीवरील ड्राव्हरने ठिबक सिंचनचे पाईप बंडल गाडीत भरुन नाशिकला गेल्याचे समजले.
त्यानंतर दि.07/11/2024 रोजी सकाळी 06/30 वाजण्याच्या सुमारास माझ्या मोबाईल फोनवर माझा मित्र अन्सार पठाण यांचा फोन आला की आला की, काल रात्री बराच वेळ वाट पाहुनही तुमची गाडी व ड्रायव्हर असे परत कंपनीत आले नाही. तसेच तुमच्या ड्रायव्हरला मी नाशिक येथुन ठिबक सिंचनचे पाईपचे रोख एक लाख रुपये आणण्यास सांगितले होते असे समजल्या नंतर मी लगेच माझ्या मोबाईल फोनमधील जिपीएस प्रणालीमध्ये माझ्या वर नमुद गाडीचे ट्रॅकरवरुन गाडीचे लोकेशन बघीतले असता गाडी बराचवेळ साईनगर रेल्वे स्थानक शिर्डी परीसर येथे एकाच ठिकाणी उभी असल्याने मी लगेच माझा ड्रायव्हर
उत्तम आगुस्तीन मकासरे याला फोन केला असता त्याचा मोबाईल फोन बंद लागत असल्याने मी तसेच, माझा भाऊ अशोक दगडु भोसले, मित्र अन्सार पठाण असे आम्ही आमचे गाडीचे मिळालेले जिपीएस ट्रॅकर प्रणालीचे मिळालेल्या लोकेशन ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी आमची गाडी उभी होती. परंतु मित्र अन्सार पठाण यांचे नाशिक येथुन दुकानदारा कडुन घेतलेले एक लाख रुपये गाडीत मिळून आले नाही. त
सेच गाडीतले इतर सामानही दिसुन आले नाही. तसेच ड्रायव्हरच्या वडीलांशी संपर्क करून उत्तम आगुस्तीन मकासरे बाबत कोठे आहे विचारले असता त्यांनी कळविले की तो आता घरी आलेला आहे असे समजले.तरी दि.06/11/2024 रोजी चे दुपारी 03/00 वा.चे ते दि.07/11/2024 रोजी चे सकाळी 09/30 वाजण्याच्या दरम्यान माझ्या गाडीवरील ड्रायव्हर नामे उत्तम आगुस्तीन मकासरे रा, सावेडी ,अहिल्यानगर याने माझा विश्वास संपादन करुन माझ्या मित्राचे एक लाख रुपये तसेच गाडीतले इतर सामान हे माझा विश्वासघात करुन घेवुन गेला आहे.
ती अद्यापपावेतो परत केली नाही. म्हणून माझी माझा ड्रायव्हर उत्तम आगुस्तीन मकासरे रा.डॉन बास्को कॉलनी सावेडी अहिल्यानगर याचेविरुद्ध फिर्याद आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर ६०७/ २०२४ नुसार भादवि कलम 316 (2 )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.