शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी जवळील निमगाव येथील हॉटेल सनराईज जवळ लघवी करण्यासाठी मोटरसायकल रोडच्या कडेला लावून थांबलेल्या एका पेरू विक्रेत्याला तीन अज्ञात भामट्यांनी दमदाटी करून खिशातील पैसे, मोबाईल व मोटरसायकल बळजबरीने हिसकावून नेली असल्याची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या घटने संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,
शिर्डीत पेरु विक्रीकरणारे पाथरे खुर्द ता. सिन्नर जि.नाशिक येथील गणेश विठ्ठल जाधव यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, मी नेहमीप्रमाणे शिर्डी येथे तीन महिण्यापासुन पेरु विकण्यासासाठी माझी हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल CD-100-SS मॉडेलची तीचा नंबर MH-15-H-5451 यावर येत असुन, माझे दैनंदिन वापरासाठी माझेकडे व्हीवो कंपनीचा Y36 मॉडेलचा मोबाईल आहे.दिनांक 11/11/2024 रोजी दुपारी मी 1700 वा चे सुमा. मी माझी मोटार सायकल नंबर MH-15-H-
5451 हीचेवर पेरू विकण्यासाठी शिर्डी येथे आलो होतो. पेरु विकुण मी दि. 11/11/2024 रोजी रात्री 11/30 वा.चे सुमारास अहिल्यानगर ते मनमाड रोडने निमगाव शिवारातुन हॉटेल सनराईज जवळून जात असतांना मी लघवी करण्यासाठी माझी मोटार सायकल रोडचे कडेला लावुन थांबलो असता अचानक शिर्डी कडुन तीन अज्ञात इसम मोटार सायकलवर आले व मला म्हणाले की,
तुझेकडील पैसे दे तेव्हा मी त्यांना विरोध केला असता त्यांनी मला दमदाटी व झटापट करून माझे पॅन्टचे डाव्या खिशातील 2100 रुपये व माझा दोन सिम असणारा पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून तसेच माझी काळ्या रंगाची सहा हजार रुपये किंमतीची एमएच १५ एच ५४ ५१ ही मोटारसायकल बळजबरीने घेवुन गेले आहे.
असे एकूण तेरा हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल चोरी गेला असल्याची फिर्याद त्यांनी तीन अज्ञात इसमाविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली असून त्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 622/ 2024 नुसार भादवि कलम 3 (5) 309 (4) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.