शिर्डी( प्रतिनिधी)
राहाता येथील एका सराफा कडून सोनं परत घेते वेळी घट धरली जाणार नाही. असं सोनं खरेदीच्या वेळी सांगितले होते. मात्र या आश्वासनाला सराफ न जागल्यामुळे त्याच्या विरोधात ग्राहक मंचामध्ये रितसर तक्रार दाखल केली असता या ग्राहक मंचाच्या सुनावणीमध्ये चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे या सराफानेच अर्ज करणारा ग्राहकच पैसे उकळण्यासाठी असा अर्ज करत असल्याचे आपल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे.
त्यामुळे एक तर पहिली आपली फसवणूक केलीच, परंतु ग्राहक मंचात सुनावणीवेळी खोट्या प्रतिज्ञापत्र द्वारे आपली बदनामीही या सराफाने केली असून त्याच्या विरोधात राहाता पोलीस स्टेशनला शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर हरिभाऊ कोते यांनी फिर्याद दाखल केली आहे.
या पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत दिगंबर हरिभाऊ कोते यांनी म्हटले आहे की,आपण राहता येथील सचिन अशोक माळवे यांच्या दुकानातून सोने खरेदी केले होते. त्यावेळी या सराफाने आपण हे सोने परत देताना त्यामध्ये घट धरली जाणार नाही असे आश्वासन दिले होते .मात्र काही दिवसांनी आपण घेतलेले सोने परत या सोनाराकडे घेऊन गेलो असता त्याने घट धरली. त्यामुळे आपण या सराफाच्या विरोधात ग्राहक मंचात दावा दाखल केला.
सन 2021 मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहिल्यानगर येथे सचिन अशोक माळवे रा. सराफगल्ली राहाता ता राहाता याचे विरोधात तक्रारी अर्ज क्रं- 84/2021 प्रमाणे दावा दाखल केलेला आहे .त्याप्रमाणे त्याची सुनावणी सुरु आहे. त्या अनुषंगाने दि- 17/10/2024 रोजी प्रतीवादी सचिन अशोक माळवे रा. सराफगल्ली राहाता ता राहाता याने मा. ग्राहक निवारण मंच अ.नगर यांचेसमक्ष सदर दाव्याच्या संदर्भात पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
व शपथ पत्रात मुद्दा क्रं 18 मध्ये सराफ सचिन अशोक माळवे यांने उलट आपल्यावरच आरोप केला आहे. या सराफाने दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, दिगंबर हरिभाऊ कोते यांनी ग्राहक मंचात दिलेला माझ्या विरोधातल्या अर्जासोबत खोटे व बनावट कागदपत्रे दाखल केले असून खोट्या व बनावट कागदपत्रांचे आधारे ते पैसे उकळण्याचे प्रयत्नात आहेत, केवळ पैसे उकळण्यासाठी सदरचा अर्ज दाखल केलेला आहे.
व यापूर्वी अनेक सोनारांचा, सराफांचा खोटेनाटे व बनावट कागदपत्र तयार करुन फसवणुक करुन त्यांना लुबाडलेले आहे. समाजात बदनामी होवु नये म्हणून इतर सोनारांनी अर्जदारासोबत अनेक वेळेस त्यांच्याशी आर्थीक तडजोड केलेली आहे, बनावट कागदपत्र तयार करुन, खोट्या केसेस तयार करुन सोनारांना गंडविण्याचा व पैसे उकळण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. अशा आशयाचे मजकुर टाकुन मा. अध्यक्ष सो, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,
अहिल्यानगर यांचे कोर्टात दि- 17/10/2024 रोजी पुराव्याचे शपथपत्र सराफ सचिन अशोक माळवे यांने दाखल केलेले असुन त्यामुळे माझी जनमाणसात मोठी बदनामी होईल असे कृत्य केलेले आहे. त्यामुळे असे खोटे शपथ पत्र देऊन माझी बदनामी करणाऱ्या राहता येथील सराफ सचिन अशोक माळवे याचेविरोधात कायदेशिर फिर्याद आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 923/ 2024 भादवि कलम 356 (2)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास राहता पोलीस करत आहेत.