शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डीत अनेक विकलांग ,अपंग ,मतिमंद, मनोरुग्ण असेही अनेक जण आधार शोधण्यासाठी येत असतात. श्री साईबाबांच्या शिर्डीत आपल्याला एक जीवनाला आधार मिळेल. सहारा मिळेल.या आशाने अनेक जण येथे येऊन भिक्षा मागतात .कुठेतरी रात्र झोपून काढतात. मात्र अशा लोकांना सहारा नसतो .त्यामुळे आजारी पडल्यानंतर काय करायचे असा प्रसंग तयार होतो. अनेक वृद्ध, मतिमंद, मनोरुग्ण असे आहेत
की त्यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती ही कंटाळतात. त्यांना शिर्डी सारख्या ठिकाणी आणून सोडतात. अशा यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. मात्र मानवतेच्या दृष्टिकोनातून अशा व्यक्तींना एक सहारा देणे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. व ते साईंच्या शिकवणीप्रमाणे प्रत्येकाने बजावले पाहिजे. व अशीच एक घटना शिर्डी मध्ये नुकतीच घडली व या घटनेमुळे साईंचा शिकवणीचा शिर्डीत कसा प्रत्येक येतो हे त्यावरून दिसून आले आहे.
शिर्डी शहरात विविध राज्यातील रेल्वे, बस येथे मोठ्या प्रमाणावर येत असतात .त्यासाठी बिहार राज्य देखील अपवाद नाही बिहार राज्यातील पुर्निया जिल्ह्यातील जलाग्रृह येथील ४० वर्ष वयाची मनोरुग्ण महिला शिर्डी येथे आलेली होती .साई मंदिराच्या लगत असलेल्या एका हाॅटेल जवळ भिक्षा मागणे व रात्रीच्या वेळी तेथेच झोपणे .कधीतरी कोणाच्या मोबाईल वरुन मुलीशी संपर्क साधणे असा तिचा नित्यक्रम ठरलेला होता .
या कमी असणारे वय व रक्ताच्या नात्यातील मुलींनी या आजीचा उपचार व सांभाळण्यासाठी दिलेला नकार व रात्रीच्या वेळी टारगट व्यसनाधीन लोकांचा त्रास हि बाब जवळच असलेल्या रिक्षा चालकाच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती मुलींच्या कानावर देखील घातली. पण उच्चशिक्षित नेपाळ मधील मुलीनी आईचा त्रास देऊ नको फोन ज्यानी केला त्यानाच आईकडे आधार कार्ड आहे. कुठेतरी आश्रमात टाकून द्या.
आम्हाला त्रास देऊ नका, असे म्हणत फोन कट केला. रिक्षा चालकांनी काही अनुचित प्रकार घडला तर शिर्डीची नको बदनामी म्हणून त्यांनी स्व खर्चाने साडी चोळी घेऊन तिला येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील संघव ऋषी वृध्दाश्रमात दाखल केले. हे रिक्षा चालक मनोरुग्ण महिलेसाठी देवदूत ठरल्याने एक प्रकारे शिर्डीतील रिक्षा चालकांनी समाजासमोर आदर्श निर्माण करुन दिला आहे
शिर्डी शहरात दोन नंबर गेट जवळ हे रिक्षा चालक आपला व्यवसाय दिवसा व रात्री करत असतात. या ठिकाणी ४० वर्ष वयाची हिंदी बोलणारी महिला दिवसा भिक्षा मागून रात्री तेथेच झोपत या महिलेला काही लोक तरुण असल्याने वाईट हेतुने रात्रीच्या प्रसंगी फिरणारे भिक्षेकरी व टुकार लोक अंगलट करून छेडछाड करतात. हे लक्षात येताच दक्षता घेऊन वाईट प्रकार होणार नाही. यासाठी मोसीन तांबोळी ,आनिल शेळके आसिफ सय्यद ,समाधान पवार मेहमूद सय्यद यांनी सहकार्य करत या महिलेला एका वृद्धाश्रमात दाखल केले.
विशेष म्हणजे स्वतःच्या मुली आपल्या जन्मदात्या आईला सांभाळण्यासाठी किंवा तिला दवाखान्यात नेण्यासाठी तयार नसताना रक्ताचे नाते नसताना परंतु माणुसकी हा धर्म पाळत येथील रिक्षा चालकांनी साईबाबांच्या शिकवणीप्रमाणे या महिलेला वृद्धाश्रमात दाखल केले. असा हा आदर्श घेण्यासारखा आहे. या जगात प्रत्येक मनुष्य प्राणी हा एक दिवस जाणार आहे .मात्र जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येकाला माणुसकीतून बघितले पाहिजे. साईबाबांनी जी शिकवण दिली ती आचरणात आणणे म्हणजेच साई सेवा आहे. असे ह्या रिक्षावाल्यांनी सुद्धा आपल्या या कार्यातून दाखवून दिले आहे.