शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती आणि मुलासह पुणे येथील पी एम पी एम एल बसमध्ये प्रवास करत असताना बसमधील एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने त्यांची छेड काढली
यावेळी प्रिया लष्करे यांनी रुद्रावतार धारण करत या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. हा व्हिडिओ सर्वत्र मोठा व्हायरल झाला .या महिलेचे कौतुक होत असतानाच या महिलेला बसमधील कोणी महिलांनीही व प्रवाशांनी यावेळी सपोर्ट केला नाही. त्यामुळे या प्रिया लष्करे या महिलेने नाराजी व्यक्त केली आहे.
पूजा लष्करे या शिर्डी येथे एका शाळेमध्ये क्रीडा शिक्षिका आहेत त्या पुणे येथे महापालिकेच्या बस मध्ये मुलगा व पतीसह प्रवास करीत होत्या. त्यावेळी एका मद्य धुंद व्यक्तीने त्यांची छेडछाड केली. त्यानंतर त्यांनी त्यास पकडून चोप दिला व या व्यक्तीला शनिवारवाड्याच्या समोरच्या पोलीस चौकीत घेऊन गेले. परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. जवळजवळ अर्धा तास त्या प्रिया यांनी या व्यक्तीला पोलीस ठाण्यात डांबून ठेवले,
त्या नंतर प्रिया यांनी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क करत घडलेला प्रकार सांगितला. त्या नंतर काही वेळाने पोलीस चौकीत आले.गाडीत बसलेल्या महिलांपैकी एकही तिच्या मदतीला आली नाही, तिच्या सोबत तिचा नवरा गाडीचे ड्रायव्हर आणि बस कंडक्टर होते. सर्व महिला बस सोडून दुसऱ्या बस मध्ये निघून गेले.
हे अतिशय चुकीचं आहे. आज महिलांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे. तरच महीलां वरचे अत्याचार बंद होतील असं प्रिया लष्करे यांनी म्हटलं आहे. या घटनेबद्दल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही अशा घटना घडल्या तर महिलांनी पुढे आले पाहिजे .धाडसाने सामोरे गेले पाहिजे. इतर महिलांनी अशा वेळेस सहकार्य व साथ दिली पाहिजे.