वर्षभरापूर्वी पोक्सो अंतर्गत गुन्ह्यात फरार आरोपी शिर्डी पोलिसांनी केला जेरबंद
राहता पोलिस स्टेशनला वर्षभरापूर्वी फिर्यादीच्या मुलीला पळवून नेऊन तीचेवर अत्याचार झाल्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली होती सदर तक्रारीवरून राहता पोलिस स्टेशनला 3 फेब्रुवारी 2023 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 64/2023 भादवी कलम 363,376 पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र गुन्ह्यातील आरोपी हा वर्षभरापासून फरार होता आज दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधीक्षक शिरीष वमने यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी रितेश वसंत सदाफळ ( राहणार पानमळा,शिर्डी ) हा शिर्डी – राहता शिवावर आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन कारवाईचे आदेश दिले
उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख,पोलिस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे यांनी नियोजनबद्ध रित्या साध्या वेशात मोटरसायकलवर जात सदर ठिकाणी सापळा रचला पोलिस आपल्याला जेरबंद करण्यास आल्याचे आरोपी रितेश च्या लक्षात येताच त्याने शिर्डी शिवावरील डी मार्ट मॉल शेजारील शेतातून पळ काढला मात्र दोघा जांबाज पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपीचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या व त्यास जेरबंद करत शिर्डी पोलिस स्टेशनला आणले..
आरोपी रितेश सदाफळ याच्यावर लोणी पोलिस स्टेशनला देखील गुन्हा रजिस्टर नंबर 504/2022 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असून गेल्या वर्षभरापासून पोलिसांना पोकसो अंतर्गत गुन्ह्यात हवा होता आज शिर्डी शीवावर आल्याची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय कार्यालयाच्या पोलिस पथकाने नियोजनबद्ध सापळा रचत शिताफीने जेरबंद केल्याने या पथकातील पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे
सदरची कारवाई ही शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख,पोलिस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे यांनी केलीय