Letest News
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड... saibaba mandir news नाताळ व नवीन वर्षाच्या तयारीसाठी साईबाबा संस्थान कडून तयारी यूपी योद्धा प्रो कबड्डी लीग च्‍या टिमने श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले अपघातात मयत झालेल्या अनोळखी व्यक्तींच्या ओळखीसाठी संपर्क साधण्याचे एमआयडीसी पोलिसांचे आवाहन! शिर्डीत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन साईभक्त महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईल लंपास! धूम स्ट... अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी! शिर्डीतील एका क्रीडा शिक्षिकेने पुणे महापालिकेच्या बसमध्ये दारुड्या प्रवाशाला दिला चोप! महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे ...
राजकीय

लोकसभा लढविणार अभिजीत पोटे शेतकरी संघटना पुरस्कृत प्रहार जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांची अपक्ष उमेदवारी

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून प्रहार जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवारी शेतकरी प्रश्नांसाठी करत आहे. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा औरंगाबाद खंडपीठाचे ज्येष्ठ विधीतज्ञ अजित काळे यांच्या नेतृत्वात राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी वीज बिल माफी पाणी प्रश्न या विविध विषयावर न्यायालयातून न्याय मिळवून दिलाय त्याचबरोबर जिल्हा शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष अहमदनगर आम्ही एकत्रित रित्या गेल्या दहा वर्षापासून विविध शेतकरी प्रश्नावर काम करत आलो आहोत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

सदर काम करत असताना आम्हाला मागील दहा वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे माननीय बच्चुभाऊ कडू व शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांचे मार्गदर्शन व नेतृत्व लाभले आहे .त्यामुळे शेतमालाला स्वामीनाथन आयोग लागू करून हमी भाव मिळावा व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी मी शेतकरी संघटना पुरस्कृत शिर्डी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी करत आहोत. जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या शिर्डीमध्ये साईबाबांनी काम केले मानव हीच जात सर्वश्रेष्ठ आहे असा संदेश दिला त्यांच्या नावाने महाराष्ट्रात असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात झेंडा पेक्षा अजेंडा महत्त्वाचा आहे या तत्त्वावर लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे व त्यांच्या समवेत असलेल्या शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे व पदाधिकारी यांनी दिली. शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेकांनी उमेदवारी करण्याची मनीषा व्यक्त केली

kamlakar

व यानुसार त्या त्या राजकीय पक्षाकडे अथवा संघटनेकडे उमेदवारी करण्याची मागणी केलेली आहे त्यानुसार नाराज होऊन उमेदवारी दिली नाही म्हणून अपक्ष लढविण्याची घोषणा केलेली आहे परंतु आम्ही ज्या प्रहार जनशक्ती पक्षामध्ये कार्यरत आहोत त्या पक्षाचे संस्थापक नेहमी सांगत असतात झेंडा महत्त्वाचा नसून अजेंडा महत्त्वाचा आहे याच अजेंड्यावर अहमदनगर जिल्ह्यात सर्व पदाधिकारी काम करत आलेले आहेत ते काम करत असताना आमचा अजेंडा म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात अन्याय तेथे प्रहार हा प्रहार करत असताना ज्या समविचारी पक्ष संघटना कायम सोबत असतात त्यांना घेऊन अन्यायावर मात करण्यासाठी कायम सात सोबत केलेले आहे. मागील दहा वर्षापासून अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आणि शेतकऱ्याचे महत्त्वाचे पीक म्हणजे ऊस त्याच्या भावा, संदर्भात काटे मारी संदर्भात,

गेलेल्या उसाचे वेळेवर पैसे मिळविण्यासाठी त्याचबरोबर सहकार संस्थेतून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबविण्यासाठी ऊस वाहतुकीचा प्रश्न ऊसतोड मजुराचे प्रश्न त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न झालेल्या फसवणुकीचा प्रश्न, दिव्यांग बांधव यांच्यासाठी तालुकास्तरीय सुविधा या बाबतीमध्ये रुग्ण सेवेच्या बाबतीमध्ये अनेक वेळा रस्त्यावरचा संघर्ष केला गेला अहमदनगर जिल्ह्यातील दळणवळणाच्या सोयी संदर्भात शासकीय पातळीवर अनेक वेळी आंदोलने केली. न्यायालयाने निकाल देऊन देखील शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली त्यासाठी केलेल्या संघर्षातून स्वतःला आणि सर्व पदाधिकाऱ्यांना गुन्हे अंगावर घ्यावे लागले प्रहार पदाधिकारी याबाबतीमध्ये जेलवारी करून आले आणि आज देखील शेतकऱ्यांच्या समस्या काही प्रमाणात सोडविण्यात यश आलेले असताना मात्र लोकशाहीत कायदे करण्याची जबाबदारी ही कार्यकारी मंडळ म्हणून खासदार यांच्याकडे असते

अहमदनगर जिल्ह्यात विविध भागांमध्ये सामाजिक संस्था राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या आग्रहा नुसार लोकशाहीचा हा संघर्ष आता आपण जनतेच्या दरबारात घेऊन जाण्यासाठी संपूर्ण दबाव वाढत होता उमेदवारीची मागणी राजकीय मोठे पक्ष यांच्यावर उमेदवार लादले गेलेले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार दगडापेक्षा वीट माऊ मतदान करण्याची इच्छा देखील नाही अशा प्रतिक्रिया शिर्डी लोकसभा मतदारसंघात ऊमटत होत्या भारतामध्ये युवा वर्ग व युवती या मोठ्या प्रमाणावर असताना काहीतरी करण्याची उमेद ही युवा वर्गामध्ये आहे लोकसभेत मात्र युवकांची संख्या त्यांच्या वाट्याला असलेल्या राजकीय अस्पृश्यतेमुळे कमी प्रमाणात दिसून येते याबाबतीत कॉलेज तरुण विद्यार्थ्यांशी हितगुज केले असता आमचा खासदार हा युवा पिढीचे प्रश्न मांडणारा त्याचबरोबर युवा पिढी यांची गरज ओळखून रोजगार निर्मिती करणारा नाविन्याला चालना देणारा असावा असा देखील मतप्रवाह असल्याने युवा पिढीचा चेहरा म्हणून देखील उमेदवारी करावीच लागणार आहे

युवकांना डावलून देश चालू शकत नाही अशी भावना युवकांची आहे ज्या शेतकऱ्यांच्या मुलांनी स्वखर्चाने कोणाचा एक रुपयाही न घेता सामान्य जनतेची आंदोलने उभा केली त्याच मुलांना घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकार परिषदेचे आयोजन करून शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विधीज्ञ अजित काळे, प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, शेतकरी संघटनेचे रूपेंद्रजी तात्या काले, प्रहार चे जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. पांडुरंग औताडे, धरणग्रस्त जिल्हाध्यक्ष कृष्णा उर्फ बंडू सातपुते, वाहतूक शाखेचे जिल्हाध्यक्ष माऊली सांगळे, प्रहार जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले ,

प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, शेतकरी संघटना ज्येष्ठ पदाधिकारी हरीअप्पा तुवर, प्रहार जिल्हा समन्वयक मेजर महादेव आव्हाड, प्रहार श्रीरामपूर विधानसभा प्रमुख आप्पासाहेब ढूस, प्रहार श्रीरामपूर विधानसभा उपप्रमुख लक्ष्मण खडके राहता तालुका प्रमुख विजय काकडे, नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे, प्रहार श्रीरामपूर तालुका युवक अध्यक्ष रघुनाथ शिंदे, दीपक पटारे रमेश भालके नानासाहेब तागड भैरवनाथ कांगुणे, शेतकरी संघटनेचे डॉक्टर रोहित कुलकर्णी, श्रीरामपूर विधानसभा कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, श्रीरामपूर विधानसभा कामगार सेल प्रमुख बाळासाहेब कराळे, प्रहार श्रीरामपूर शहराध्यक्ष सोमनाथ गर्जे देवळाली शहराध्यक्ष प्रकाश वाकळे, गणेश भालके जिल्हा पदाधिकारी शेतकरी संघटनेचे तालुका पाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांनी यांनी दिली यावेळी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button