व्हीएम मशिन तसेच व्हिव्हिपॅटवर संशय घेत त्याच्या चौकशीची भाजपाचे पराभूत उमेदवार मा. खा. डॉ. सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी चुकीची असल्याचे सांगत
महाविकास आघाडीचे खासदार नीलेश लंके यांनी विखे यांनी ईव्हीएमवर खापर न फोडता पराभव मान्य करा असा सल्ला त्यांना दिला आहे.
मा. खा. डॉ. सुजय विखे यांनी ईव्हीएम मशिन तसेच व्हिव्हिपॅटवर संशय घेत श्रीगोंदे येथील १०, पारनेर १०, नगर,शेवगांव-पाथर्डी व कर्जत-जामखेड, व राहुरी येथील प्रत्येकी ५ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम व व्हिव्हिपॅट पडताळणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
डॉ. विखे यांच्या या मागणीनंतर खा. नीलेश लंके यांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर न फोडता पराभव मान्य करा असा सल्ला हंगे येथे गुरूवारी माध्यमांशी बोलताना दिला.यावेळी बोलताना लंके म्हणाले,
माझ्या राजकीय जीवनात मी अनेक निवडणूका पाहिल्या. जिल्हा, राज्य व केंद्र स्तरीय निवडणूका मी हाताळल्या असून त्या पारदर्शीपणे पार पडल्याचा माझा अनुभव आहे.
नगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर राज्यात सर्वात उशिरा या मतदारसंघाचा निकाल जाहिर झाला. प्रत्येक गोष्ट चार चार वेळा प्रत्येक अधिकाऱ्याने नजरेखालून घातली. चार चार वेळा प्रत्येक आकडे तपासण्यात आले.