अपहरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न,शिर्डीत गुन्हा दाखल
अपहरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न,शिर्डीत गुन्हा दाखल
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलींचे अपहरण करून तिचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी आरोपीस अटक करून त्याची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी करत असताना सदर गुन्ह्याबाबत सहानुभूती मिळवून सुटका करून घेण्यासाठी आरोपीने लघु शंकेच्या निमित्ताने पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केल्या प्रकरणी आरोपी रोहित इंद्रभान खुरसणे (वय-२०) याचे विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्यातील १८ ते २५ वयोगटातील तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून,याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.कारण मार्च २०२३ महिन्यात तब्बल ०२ हजार २०० मुली बेपत्ता झाल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे.म्हणजेच रोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे.विशेष म्हणजे बेपत्ता तरुणींमध्ये सर्वाधिक १८ ते २० या वयोगटातील मुलींचा समावेश आहे.तर जानेवारी महिन्यात १६०० आणि फेब्रुवारी महिन्यात ०१ हजार ८१० मुली बेपत्ता झाल्या असल्याची नोंद झाली आहे.बेपत्ता झालेली मुलगी जर अल्पवयीन असल्यास पोलीस अशावेळी अपहरणाची नोंद करतात.तसेच मुलगी अल्पवयीन असल्याने तिची ओळख जाहीर होणार नाही या हेतून पोलिसांच्या संकेतस्थळावर याची स्वतंत्र नोंद केली जात नाही.परंतु सज्ञान मुलींच्या बेपत्ता झाल्याची नोंद मात्र पोलिसांच्या संकेतस्थळावर केली जाते.धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींची संख्या अधिक असल्याचे देखील समोर आले आहे.अशीच एक घटना शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी महिन्यात घडली होती ती नुकतीच उघड झाल्याने शिर्डीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदर अल्पवयीन मुलीचा आरोपीसह शोध घेत असताना सदर आरोपी हा संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे दडून बसला असल्याची गुप्त माहिती शिर्डी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार दि.०२ मार्च रोजी सदर ठिकाणी पोलीस धडकले असता त्याना त्या ठिकाणी आरोपी व अल्पवयीन मुलगी आढळून आले होते.त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु असताना त्या ठिकाणी मुलीची आई व महिला पोलीस कर्मचारी प्रमिला शहाणे या तपास करत असताना दरम्यान च्या काळात आरोपी खुरसणे यास पोलीस ठाण्याच्या अंमलदार कक्षात रात्री ९.१५ वाजता बसवले होते.त्यावेळी त्याने आपल्याला लघुशंकेसाठी जाण्याचा बहाणा करत तो स्वच्छतागृहात गेला होता.त्यावेळी त्याने पोलिसांची नजर चुकवून आपल्या खिशात एक छोटी स्पेरॉइड नावाचे नशेचे औषधांची बाटली थेट पिऊन घेतली होती.त्यामुळे तो बाहेर आला असता त्यास मळमळ व चक्कर येऊ लागले होते.हि बाबत संबंधित पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने त्यास पोलीस अंमलदार रविंद्र गोंदे,बाबासाहेब ज-हाड,होमगार्ड सागर जाधव,होमगार्ड अहीरे यांचे मदतीने त्यास श्रीसाईबाबा हॉस्पीटल शिर्डी येथे औषोधपचार कामी दाखल केले होते.
दरम्यान त्याने,”आपले व सदर मुलीचे प्रेमसंबंध असून आपल्याला तिच्याशी लग्न करायचे आहे”आपल्याला जगायचे नसल्याचे सांगून शासकीय कामात अडथळा आणण्यासाठी विषारी औषध प्राशन केले व जीवन संपविण्याच्या प्रयत्न केला असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळे त्याचे विरुद्ध सोळा दिवसापूर्वी दाखल झालेला गुन्हा क्रं.९३/२०२४ भा.द.वि.कलम ३६३ गुन्हा दि.१९ फेब्रुवारी रोजी दाखल झालेला असताना आरोपी रोहित खुरसणे याचे विरुद्ध शिर्डी पोलीस उपनिरीक्षक दिनेश मोरे (वय-३४) यांनी आणखी एक गुन्हा दखल केला आहे.
दरम्यान शिर्डी पोलिसांनी त्यास शिर्डी येथील रुग्णालयात भरती करून त्यास प्रतिबंधक औषध देऊन त्याचा जीव वैद्यकीय अधिकाऱ्यानी वाचवला असून त्याचे शिर्डी पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा क्रं.१५३/२०२४ भा.द.वि.कलम ३०९ प्रमाणे दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी पुढील तपास शिर्डी पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय रामनाथ पवार हे करत आहेत.