शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी येथील कालिका नगर येथील बाजार तळावर अवैधरित्या पत्र्याच्या शेडमध्ये महाराष्ट्र राज्यात गोवश जनावराची कत्तल करण्यास बंदी असताना संगणमत करून गोवंश जनावराची कत्तल केलेल्या अंदाजे १लाख ४०हजार रुपये किमतीचे ७०० किलो गोमा्स शिर्डी पोलीसांनी कारवाई करुन ताब्यात घेतले आहे यात ४० हजार किमतीचे मोबाईल व ८०हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी व धारदार शस्त्र असा जवळपास गोमांस मोबाईल दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे
संदरचा प्रकार ३ डिसेंबर रोजी उघडकीस आला पाच इसम पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री करत असल्याची माहिती काही जागरूक कार्यकर्त्यांनी शिर्डी पोलिसांना दिल्यानंतर शिर्डी पोलिसांनी भेट देऊन कारवाई केली यात सहभा असलेले आरोपीनी आपण कोपरगाव व ममदापुर येथील असल्याचे सांगितले त्याची नावे शेरखान कुरेशी वय ४५ राहणार कोपरगाव सादिक कुरेशी वय ४५ ममदापुर समीर कुरेशी वय २१ राहणार कोपरगाव सोहेल कुरेशी
वय २७ रा कोपरगाव मुस्ताक कुरेशी वय २० रा ममदापुर येथील असल्याचे पुढे आले असुन पोलीस कर्मचारी प्रसाद सुर्यवंशी यांच्या फिर्यादी वरुन शिर्डी पोलीसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ६५६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१,३२५,३(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहे