बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँग पुन्हा चर्चेत आली आहे. या घटनांनंतर लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने लॉरेन्स बिश्नोई गँगविरुद्ध कारवाई सुरु करत देशभरातील विविध राज्यातून सात शुटर्सना अटक केली आहे.
पंजाब आणि इतर राज्यातून या शुटर्सना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत.
तसंच लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल बिश्नोईची माहिती देणाऱ्याला दहा लाखांच्या बक्षीसाचीही पोलिसांकडून घोषणा करण्यात आली आहे.
मुंबईत अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केल्या प्रकरणी एनआयकडून अनमोल बिश्नोईचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरुनच सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप करत कोर्टाने दोघांचा जामीन फेटाळला.