अतिक्रमण करणारे यांच्यावर शिर्डी पोलिस स्टेशन,श्री साईबाबा संस्थान सुरक्षा विभाग आणि शिर्डी नगरपरिषदेच्या संयुक्त पथकाने कारवाईचा बडगा उगारला
श्रीराम नवमी उत्सवाला हजेरी लावण्यासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली असताना रस्त्यावर,मंदिर परिसरात व अन्य ठिकाणी भाविकांना चालण्यासाठी अडथळा ठरणारी वाहने,,व्यावसायिक आणि अतिक्रमण करणारे यांच्यावर शिर्डी पोलिस स्टेशन,श्री साईबाबा संस्थान सुरक्षा विभाग आणि शिर्डी नगरपरिषदेच्या संयुक्त पथकाने कारवाईचा बडगा उगारला
साईबाबा संस्थानचे मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी,शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी स्वतः या कारवाईत भाग घेत रस्त्यावर कुठेही सायकल लावत पेरू विक्री करणारे,मंदिर परिसरात दुकानांच्या बाहेर टेबल लाऊन व्यवसाय करणारे तसेच भाविकांना अडथळा होईल अश्या प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांवर आज कारवाई करण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये धावपळ उडाली होती
तसेच साई कॉम्प्लेक्स मधील दुकानांच्या बाहेर विक्रीसाठी लावलेल्या वस्तू जप्त करत शिर्डी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली तर संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी स्मार्ट वर्क केल्याचे यावेळी दिसून आले..कॉम्प्लेक्स मधील काही दुकानदारांनी साईबाबा संस्थानच्या ताब्यातील दुकानांच्या आतील बाजूस असलेल्या शटर वर व्यवसाय सुरू केल्याचे रोहिदास माळी यांच्या लक्षात येताच त्यांनी दोन्ही बाजूचे शटर आपल्या साध्या वेशातील सुरक्षा रक्षकांना उघडण्यास सांगितले व काहींनी विक्रीच्या वस्तू अडकविण्यासाठी लावलेले आकडे स्वतः माळी यांनी हाताने काढून टाकत यापुढील काळात संस्थानच्या दुकानाच्या आतील बाजूस व्यवसाय करता येणार नसल्याचे सूतोवाच केल्याचे दिसून आल्याने अनेकांनी त्यांच्या ह्या स्मार्ट वर्क बाबत कौतुक केले
त्याचप्रमाणे पोलिस निरीक्षक कुंभार यांनी देखील मंदिर परिसरातील महिला भाविकांना चैन चोरी होऊ नये म्हणून काळजी घेण्यास सांगितले यावेळी मोठा लावजमा मंदिर परिसरात फिरत असल्याने गंध लावणारे तरुण, हातावर विक्री करणारे तसेच अतिक्रमण करणारे यांची धांदल उडाल्याचे दिसून आले