![](https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/11/download-3.jpg)
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. ऐन निवडणूकीच्या तयारीत आपल्याला दिशा दाखवणारा नेता रुग्णालयात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पण प्रकाश आंबेडकर यांनी आपले कार्यकर्ते, नेते आणि मतदारांसाठी खास संदेश जारी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यांची नुकतीच अँजिओप्लस्टी झाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या धामधुमित प्रकाश आंबेडकर यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे
प्रकाश आंबेडकर यांनी आलं एक व्हिडिओ जारी केलाय. यात ते मतदारांना भावनिक साद घालताना दिसत आहेत. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येईल, असा संदेश यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.