२१ ते २४ जानेवारी रोजी शिर्डी शहरात भव्य श्रीराम कथेचे आयोजन सोहळ्याचे अध्यक्ष अभय शेळके यांचे व ग्रामस्थांचे आवाहन
शिर्डी / श्रीराम मंदिर उत्सव समिती शिर्डी यांचे वतीने शिर्डी शहरात दि. २१ ते २४ जानेवारी याकाळात शिर्डी येथील साईनगर ग्राउंडवर दररोज सायंकाळी ६ ते रात्रौ १२ वा. भव्य श्रीराम कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२१ जाने ते २३ जाने २०२४ दरम्यान श्रीराम कथेचे वाचन रामायणाचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांच्या सुश्राव्य वाणीतून सादर करण्यात येणार आहे. दि २४ जाने रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजता काल्याचे कीर्तन १२ ते २ वाजेदरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ जाने २०२४ रोजी काल्याचे कीर्तनाच्या प्रसंगी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे उपस्थित राहणार आहेत.
दि.२२ जाने रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे प्रभु श्रीराम, सीतामाई आणि बंधू लक्ष्मण यांच्या भव्य दिव्य तेजस्वी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात व दिमाखात करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. दि २२ जाने रोजी साजरा होणारा हा सोहळा संपुर्ण भारत वर्षात अगदी दिवाळी सणाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. याविषयी देशातील सर्व नागरिकामध्ये प्रचंड उत्साहाची भावना तयार झाली आहे. हा ऐतिहासिक सोहळा साजरा करण्यासाठी प्रत्येकजण
आपापल्या परीने यात सहभागी होणार आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान ना.नरेंद्रजी मोदी हे स्वतः अयोध्या येथे उपस्थित राहून पूजा विधीसह सर्व गोष्टींवर घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथे भारतीय जनता पार्टी व सहकारी पक्षांच्या वतीने शिर्डी शहरात देखील आपण योग्य असा कार्यक्रम घेवून त्याचे नियोजन करावे म्हणुन बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतील अनुषंगानेच या भव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी शहरातील सर्व ग्रामस्थांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हूलवळे यांची भेट घेऊन श्री क्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात देखील अयोध्या येथील धर्तीवर उत्साहाचे व धार्मिक वातावरण व्हावे म्हणुन श्री साईबाबा संस्थान यांनी श्री साईबाबा समाधी मंदिर परिसर व मंदिर परिसरात सर्वत्र तसेच श्री साईबाबा संस्थानच्या कार्यालयांसह इतर सर्वच इमारतींवर आकर्षक विद्युत
रोषणाई करावी.
तसेच श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात दि. २१ ते २३ जाने २०२४ या काळात सर्व भक्तांना, ग्रामस्थांना तसेच पंचक्रोशीतील रामभक्तांना मिष्टान्न भोजनाचे नियोजन करणेस सांगितले आहे
श्रीराम कथा सोहळ्याच्या निमित्ताने दि. २१ जाने रोजी शिर्डी शहरातील व पंचक्रोशीतील महिला
मोठ्या संख्येने सहभागी होणार असुन त्या दुपारी ३:३० वा. समाधी मंदिर परिसरात एकत्र जमुन
स्वतःचा पाण्याने भरलेला मंगल कलश डोक्यावर घेवून समाधी मंदिरापासून पालखी रोड मार्गे गेट
नं ४ समोरून नगर मनमाड हायवेने बस स्टँड व तेथून साईनगर येथील मैदानावर मिरवणुकीने
वाजतगाजत जाणार आहेत. साईनगर येथील श्रीराम कथा सोहळ्याच्या ठिकाणी या मंगल
कलशातील पाण्याने या महिलाभक्तांच्या शुभहस्ते अभिषेक करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वा.
या मिरवणुकीची साईनगर येथे सांगता होणार आहे.
या श्रीराम कथा सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डी येथील शालेय विद्यार्थी रामायणातील वेशभूषा करून विविध देखाव्यांचा चित्ररथ सादर करणार आहेत. शिर्डी शहरातील ग्रामस्थांचे वतीने शिर्डी शहर संपुर्ण भगवेमय अतिशय स्वच्छ व अगदी दिवाळी मध्ये काढण्यात येणा-या रांगोळीसह पणत्या दिवे पेटवून उत्सव साजरा करतो त्याप्रमाणेच हा उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. शहरात सर्वत्र भगव्या पताका, भगवे झेंडे लावुन आकर्षक विद्युत रोषणाई करून सजविण्यात येणार आहे. यासाठी शिर्डी ग्रामस्थ, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपरिषद यांच्या सहकार्यातून या सर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या ४ दिवसीय चालणा-या श्रीराम कथा सोहळ्याच्या श्रीराम मंदिर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अभय शेळके पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच समितीच्या कार्याध्यक्षपदी शिवाजी गोंदकर, उपाध्यक्षपदी निलेश कोते व विजय
जगताप यांची तर मार्गदर्शक म्हणुन कैलास कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, बाबासाहेब कोते, कमलाकर कोते यांची निवड करण्यात आली आहे. समितीच्या कार्यवाहक म्हणून रमेश गोंदकर तर खजिनदार म्हणुन संदीप पारख तर समन्वयक म्हणुन सचिन तांबे, सुजित गोंदकर, सचिन शिंदे, गजानन शेर्वेकर, मंगेश त्रिभुवन, दीपक वारुळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच रवींद्र गोंदकर, युवा शिर्डी ग्रामस्थ, छत्रपती शासन तसेच शहरातील सर्व युवक आणि शिर्डी शिर्डी शहरातील सर्व ग्रामस्थांनी श्रीराम कथा सोहळा भव्य दिव्य व्हावा यासाठी आपले यशस्वी प्रयत्न सुरु केले आहेत. या श्रीराम कथा सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डी शहरातील समस्तां ग्रामस्थ उपस्थित राहणार आहे