Blog
जरांगेंचे आवाहन
सांगली- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज सांगलीमध्ये सभा झाली. यावेळी मराठा समूदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, ‘आता आराम करुन चालणार नाही. नाहीतर आपल्या लेकरांचं वाटोळं होईल. आपल्या लेकरांना भविष्यात त्रास होईल असं आपल्याला काही करायचं नाही.’ जरांगेंच्या सभेवेळे प्रचंड घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं.
जाहिरात
मराठा समाज कधी शहाणा होणार. सर्वांची पोरं ऊस तोडायला गेल्यावर शहाणा होणार का? आता गाफील राहून चालणार नाही. सगळ्यांनी चारी बाजूंनी मराठ्याला घेरलं आहे. हे षडयंत्र मोडून काढण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागले. गेल्या ७० वर्षांपासून असलेला वेढा आपल्याला फोडावा लागेल. ज्या मराठा बांधवांना आरक्षण आहे, त्यांनीही एकत्र घेण्याची येण्याची गरज आहे, असं जरांगे म्हणाले.