अहिल्यानगर, दि.३०- भारत निवडणूक आयोगाने शिर्डी आणि कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी कविथा रामू (भा.प्र.से.) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक निरीक्षक कविथा रामू यांच्याशी ८८३०७८४६५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार असून त्यांना शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत भेटता येईल.
निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३७८७३३४ असा असल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
219 कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज दिनांक 30 10 2024 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होऊन शांततेत समाप्त झाली .
यावेळी निवडणूक निरीक्षक माननीय कविता रामू उपस्थित होत्या निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री जगताप व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राप्त सर्व 30 नाम निर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली
त्यापैकी 29 नामनिर्देशन पत्र ही वैध ठरवण्यात आली व एक नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आले छाननीअंती 219 कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून आता 19 उमेदवारांचे 29 अर्ज वैध ठरलेले आहेत वैद रित्या नामनिर्दिष्ट 19 उमेदवारांची यादी तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे