शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी हे श्री साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले आहे. देशात तिरुपती नंतर सर्वात श्रीमंत समजले जाणारे हे देवस्थान आहे. येथे दररोज हजारो व उत्सव काळात लाखोंच्या संख्येने साईभक्त साई दर्शनासाठी येत असतात. तसेच व्हीआयपींची येथे मोठी वर्दळ असते. त्यामुळे येथे मोठी सुरक्षा तैनात आहे.
त्यातच बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी रात्री अकराच्या सुमारास मंदिर परिसरात अतिरेकी घुसल्याची(बनावट ) बातमी येताच व संस्थांनच्या सुरक्षारक्षकांनाही अतिरेक्यांनी बंधक बनवले. असे समजताच सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली.तात्काळ साई संस्थांनचे सुरक्षारक्षक, संस्थांनचे सुरक्षा पोलीस कर्मचारी , हे अलर्ट झाले. नक्की कोणाला काही समजेना काय झालं आहे. त्यातच मंदिर परिसरात सायरन वाजवत अग्निशामक बंब, रुग्णवाहिका ,
पोलीस व्हॅन आल्या, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, पोलीस कृती दल पथकाचे कर्मचारी, पोलीस अधिकारी हे या बातमीमुळे त्वरित घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे मुंबई येथील एनएसजीचे कमांडो ही मोठ्या संख्येने येथे सशस्त्र दाखल झाले. सुमारे दीडशे एनएसजी कमांडोंचा फौज फाटा अधिकाऱ्यांसह सशस्त्र शिर्डीत दाखल झालेला होता. बुधवारी रात्री श्री साईबाबांची शेजारती संपन्न झाली.
सर्व साईभक्त मंदिर परिसरातून बाहेर निघत असतानाच मंदिर व परिसरामध्ये एन एस जी चे ब्लॅक कमांडो यांचा मोठा सशस्त्र ताफा परिसरात दिसत होता. अनेक पोलीस व्हॅन ,अग्निशामक, रुग्णवाहिका यांचा ताफा दिसत होता. त्यामुळे नक्की काय झाले हे कोणाला काही समजत नव्हते. त्यात रात्री अकरा वाजता एनएसजीच्या ब्लॅक कमांडोंनी आपापली पोझिशन घेऊन तात्काळ ॲक्शन घेतली. सर्वजण मोठ्या हिमंतीने
तैनात राहून वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत असतानाच आदेश मिळाला आणि लगेचच ॲक्शन सुरू झाली. एनएसजीचे कमांडो यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार नियोजनबद्ध आक्रमण केले.
येथे तोंड बांधलेल्या व घुसलेल्या अतिरेक्यांनी संस्थांनच्या दोन-तीन सुरक्षारक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून बंधक केले होते. मात्र एन एस जी च्या कमांडोंनी सर्व दक्षता घेत या अतिरेक्यांना पकडले. त्यांचे शस्त्र जप्त केले. त्यामुळे हा सर्व प्रकार पाहणाऱ्या परिसरातील संस्थान कर्मचारी, ग्रामस्थ,साईभक्त यांनी निश्वास सोडला.
असा हा चोर व पोलीस म्हणजे एनएसजी ब्लॅक कमांडो व अतिरेकी यांचा हा सरावाचा खेळ अखेर गुरुवारी पहाटे चार वाजता संपला. हा एन एस जी कमांडोंच्या सरावाचा भाग होता. शिर्डी साई मंदिर परिसरात एन एस जी कमांडोंनी मॉक ड्रिल केले होते. मात्र हे मॉक ड्रिल होण्याअगोदर याची खबर कोणाला नव्हती. त्यामुळे हा प्रकार खरोखरच आहे? अशी नागरिक, साईभक्त, यांचा समजूत झाली होती.
मात्र नंतर हे मॉक ड्रिल असल्याचे कळल्याने सर्वांनी सुस्कारा सोडला. या एनएसजी कमांडोच्या मॅकड्रिल मध्ये अधिकाऱ्यांसह सुमारे दीडशे सशस्त्र जवान सहभागी झाले होते.तब्बल पाच तास हा प्रकार चालू होता. अखेर सशस्त्र एन.एस.जी कमांडोंनी घुसखोरी करणाऱ्या या बनावट अतिरेक्यांना पकडले व त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केली. व त्यांना ताब्यात घेतले. व हे मॉक ड्रिल संपले .
त्यामुळे सर्वांनीच आनंद व्यक्त केला तसेच बघणाऱ्या सगळ्यांनीच भारत माता की जय, साईबाबा की जय ,असा एक स्वरात नारा लावला व विजयाचा आनंद घेतला. व एन एस जी च्या कमांडोंनाही मोठी प्रेरणा दिली. यापूर्वी शिर्डीत तीन-चार वर्षांपूर्वी एन एस जी च्या कमांडोनी मॉक ड्रिल केले होते. एका कमांडोला मॉक ड्रिल संपल्यानंतर पत्रकारांनी विचारले असता मॉक ड्रिल हा सरावाचा भाग असतो .वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी तो अचानक केला जातो. हा एक सरावाचा भाग आहे. असे त्यांनी सांगितले.