शिर्डी (प्रतिनिधी)
कोरोना काळापासून साई मंदिरात हार फुलांना व प्रसादाला नेण्यास बंदी होती. मात्र आज गुरुवार १२ डिसेंबर 24 पासून साई मंदिरात हार फुलांना व प्रसाद नेण्यास प्रवेश सुरू झाला आहे. साई भक्त आता साई मंदिरामध्ये हार फुले व प्रसाद मनोभावे नेऊन साईबाबांना अर्पण करणार आहेत त्यामुळे साई भक्तांमधून तसेच ग्रामस्थांमधून मोठा आनंद व्यक्त होत आहे.
माननीय उच्च न्यायालयाच्या
निर्देशानुसार आज गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ पासून श्री साईबाबा समाधी मंदीरात फुल – हार प्रसाद सुरू झाले.
आज मा. खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन हार फुले अर्पण केली, यावेळी श्री साईबाबा संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्र. उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात ,
साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार आदी उपस्थित होते. मंदिरात डॉक्टर सुजय विखे तसेच प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब कोळेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा मंडळे मंदिर प्रमुख विष्णू थोरात , जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,साई संस्थान
सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार आदींसह शिर्डी कैलास कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, अभयराजे शेळके गोपीनाथ गोंदकर सुजित गोंदकर विजय कोते मंगेश त्रिभुवन वेणूनाथ गोंदकर ताराचंद कोते तसेच विविध गावातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.