शिर्डी लोकसभा मतदार संघात महायुतीच्या वतीने शिवसेनेचे उमेदवार खा सदाशिव लोखंडे,उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्यात काट्याची लढत होईल
असे चित्र असतांनाच ओबीसी बहुजा. पार्टी आणि जनहित लोकशाही पार्टी पुरस्कृत उमेदवार अशोक रामचंद्र अल्हाट यांनी शिर्डीतील हॉटेल शांतीकमल येथे ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे ,
ओबीसी नेते टी पी मुंडे,ओबीसी नेते रामराव महाराज भाटेगावकर,विमुक्त भटके नेते मच्छिंद्र भोसले या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आणि मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प मेळावा घेत आपले शक्तिप्रदर्शन केले व प्रस्थापित धनदांडग्या नेत्यांनी आजवर ओबीसी समाज,बहुजन आणि मागासवर्गीय समाज यांचा सत्तेसाठी फक्त वापर करून घेतल्याचे सांगत
शिर्डी मतदार संघात अशोक रामचंद्र अल्हाट यांना उमेदवारी देत प्रस्थापितांपुढे मोठे आव्हान उभे केले असल्याचे ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सांगितले व यापुढील काळात आमच्या ओबीसी बहुजन समाजातील बांधवांना उमेदवारी साठी कोणापुढे हात पसरण्याची गरज नसून
आम्ही हवी त्याला उमेदवारी देऊ आणि आगामी विधानसभा निवडणुकीत थेट 288 उमेदवार उभे करून आमदार आमचा,मंत्री आमचा अन् मुख्यमंत्री सुद्धा आमचाच असा अजेंडा घेऊन यापुढील काळात मार्गक्रमण करत प्रस्थापितांना मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवणार असल्याचा इशारा दिलाय