शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी विधानसभा मतदार संघातून बहुजन वंचित आघाडीचे सर्वोसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे निकटचे संबंध असलेले प्रकाश आंबेडकर यांचे अगदी विश्वासातील असणारे समाजसेवक राजू सादिक शेख यांनी दिनांक २९/१०/२०२४ रोजी बहुजन वंचित आघाडी कडून अधिकृत अर्ज दाखल केले आहे .
बहुजन वंचित आघाडीने यंदा शेख यांना उमेदवारी जाहीर केल्याने सर्वधर्मियांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झालेलं आहे राजू शेख हे कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असतात .मुस्लिम असतांना सर्व हिंदूंचे सण साजरे करतात . त्यांचा राहाता तालुक्यात जनसंपर्क मोठा आहे. राजू शेख यांनी उमेदवारी करू नये.
म्हणून प्रचंड दबाव टाकण्यात आले .परंतु हि निवडणूक जनतेच्या भल्यासाठी लढणार असल्याचे त्यांनी दैनिक साई दर्शन बोलतांना सांगितले. बहुजन वंचित आघाडी ह्या पक्षाचे उमेदवार म्हणून आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राहाता यांच्याकडे दाखल केले असून
हि शिर्डी विधानसभा निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची होणार आहे आणि जनता मला अधिकाधिक मताने निवडून देईल .असा विश्वास राजू शेखह यांनी व्यक्त केला आहे. व आपला प्रचारही त्यांनी सुरू केला आहे.