इंदोरीकर महाराजांना जामीन मंजूर
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अपत्यप्राप्ती संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळालाय. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर न्यायालयाकडून इंदोरीकर महाराजांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी इंदोरीकर महाराजांनी अपत्यप्राप्ती संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध PCPNDT कायद्याअंतर्गत दाखल गुन्हा करण्यात आला होता.संगमनेर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू असताना न्यायालयाने जामीन अर्ज सुनावणीसाठी २४ नोव्हेंबर तारीख दिली होती. मात्र, सुनावणीच्या एक दिवस आधीच इंदोरीकर महाराज स्वतः कोर्टात हजर राहिल्याने वकिलांनी न्यायालयाला विनंती केल्याने त्यांना २० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालाय अशी माहिती इंदोरीकर महाराजांचे वकील एडव्होकेट के.डी धुमाळ यांनी दिली आहे.