निवडणूक आयोगावर टीका करताना जगताप म्हणाले की, ‘ इतकी मोठी आपली लोकशाही आहे, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे जर लोकशाहीवर काही प्रश्न उपस्थित केले जात असतील, काही शंका असतील तर त्याचं उत्तर हे निवडणूक आयोगाला आणि सरकारला द्यावंच लागेल.
निवडणूक आयोग श्वान आहे. जेवढ्या काही संस्था आहेत या सर्व संस्था श्वान होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्याबाहेर बसल्या आहेत. ज्या संस्था आपल्या लोकशाहीला मजबूत बनवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्याचं असा व्यवहार करत आहेत.’ या शब्दात भाई जगताप यांनी वादाला तोंड फोडलंय.
त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलंय. भाजप आणि शिवसेनेसह सत्ताधारी नेत्यांनी जगताप यांच्या वक्तव्याचा कडाडून निषेध करत माफी मागण्याची मागणी केलीये. मात्र काँग्रेस नेते भाई जगताप त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितलंय.
जगपात म्हणाले की, ‘निवडणूक आयोग आभाळातून आलेला नाही. लोकशाहीला बळकट करण्यासाठी आयोगाची स्थापना झाली असून कुणाची हुजरेगिरी करण्यासाठी आयोगाची स्थापना झालेली नाही. आयोग हुजरेगिरी करत असल्यामुळेच मी त्यांच्यावर टीका केली. मी माझ्या विधानावर ठाम आहे. टीएन शेषण यांनी ज्याप्रकारे काम केले, तसंच काम करण्याची आता गरज आहे.