मोठी कारवाई..शिर्डी नगरपरिषदेचा मे. एस गंगवाल यांच्या दुकानावर छापा!
शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी येथील प्रतिष्ठित व्यापारी मे. एस. गंगवाल यांच्या दुकानावर शिर्डी नगरपरिषदेच्या नितेश मिरेकर यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण पथकातील नवीन शेजवळ , बाप्पु काळवाघे ,अनिल शेळके, राहुल लामखेडे, अयुब शेख, सलीम इनामदार, संतोष पंडित ,सुंदर धायतडक ,निलेश चांडे आदींच्या पथकाने छापा टाकून सुमारे दहा लाख रुपये किमंतीचे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व इतर प्लॅस्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून त्यामुळे शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शिर्डी शहरात मे. एस गंगवाल हे प्रतिष्ठित व्यापारी असून यांच्या दुकानात प्लास्टिक पिशव्या व इतर बंदी असलेले प्लास्टिक साहित्य असे सुमारे दहा लाख रुपये किंमतीचे साहित्य नगरपरिषदेच्या आज या छाप्यामध्ये सापडले असून शिर्डी नगरपरिषद यांची कारवाई सुरू आहे. दरम्यान यापूर्वीही मे.एस गंगवाल या दुकानावर दोनदा छापे टाकून असेच बंदी असलेले प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक मालमत्ता जप्त करण्यात आले होते. राज्य शासनाने पर्यावरण, स्वच्छता आरोग्याचा विचार करून राज्यामध्ये प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक च्या वापरास, विक्री करण्यास, बंदी केली आहे.
शिर्डी शहरात तर स्वच्छ शहर सुंदर शहर बनवण्याचा नगरपालिकेतर्फे व ग्रामस्थ तर्फे विविध उपक्रम राबवून सातत्याने प्रयत्न सुरू असतो. मात्र येथे विविध दुकानांना बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या होलसेल दरात गंगवाल विक्री करत असल्याचे नागरिक सध्या बोलत आहेत. नगरपालिकेला या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर नगरपालिकेने मे.एस गंगवाल यांच्या दुकानावर आज बुधवारी छापा टाकला. या छाप्यामध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व प्लॅस्टिक साहित्य असे एकूण दहा हजार रुपये किमंतीची मालमत्ता जप्त केली असून कारवाई करण्याचे काम सुरू आहे. मात्र बंदी असलेल्या प्लास्टिक वापर, विक्रीवर व दुकानात ठेवण्यावर बंदी असली तरी अनेक जण सर्रास वापर करतात.
जरी हा गुन्हा केला तरी फारसा दंड भरावा लागत नाही. त्यामुळे वारंवार असे गुन्हे केले जातात. एकदा दोनदा दंड होतो. तिसऱ्यांदा मात्र गुन्हा दाखल होतो. आता शिर्डी नगरपालिका तिसरांदा मे.एस गंगवाल दुकानावर छापा टाकून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत . त्यामुळे मे.एस गंगवाल यांच्या दुकानावर गुन्हा नगरपालिका दाखल करणार का? फक्त दंडात्मक कारवाई करणार असा सवाल शिर्डी ग्रामस्थ ,साईभक्तांमधून होत आहे. पैशाच्या लालसेपायी अनेक जण कायदेशीर बंदी असतानाही व कायद्याच्या चौकटीत बसत नसतानाही नियम कायदा मोडून व्यवसाय करतात व पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याशी खेळतात. हे कितपत योग्य आहे. पैसा असला तर सर्व काही करायचे व मिटवायचे ? असा हा ठेका व समज काहींना झाला आहे. मात्र कायदा मोठा आहे. कायद्यापुढे छोटा मोठा कोणी नसतो .सर्व सारखे असतात. त्यामुळे जो कोणी जाणीवपूर्वक परत परत असे गुन्हे करत असेल तर त्यावर नगरपालिका आता काय कारवाई करणार! असा प्रश्न येथील ग्रामस्थ ,साईभक्त उपस्थित करत आहेत.